Stress In Chicken: कोंबड्यांना येणारा ताण; कारणे आणि त्यावरील उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अंतर्गत शारीरिक कार्य सामान्यपणे करण्यासाठी कोंबड्या (Stress In Chicken) विविध वर्तणूक आणि चयापचय यंत्रणा वापरते, यालाच कोंबड्यातील “ताण” असे म्हणतात. व्यावसायिक कोंबडी पालनातील (Poultry Farming) कोंबड्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. कोंबडीच्या ताणाचा कळपाच्या एकूण आरोग्यावर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. त्यामुळे तणाव (Stress In Chicken) निर्माण करणारे घटक समजून घेणे गरजेचे आहे. हे घटक ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हा यशस्वी पोल्ट्री उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जाणून घेऊ याविषयी.

कोंबड्यांना ताण येण्याची विविध कारणे (Causes Of Chicken Stress)

  • अचानक हवामानातील बदलामुळे (Sudden Climate Change) कोंबड्यांना ताण येऊ शकतो आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते आणि ते संवेदनशील बनतात.  
  • वेगवेगळ्या कारणांमुळे कोंबड्या पुरेशा प्रमाणात आहार घेत नसतील तर ताण (Stress In Chicken) येऊ शकतो.
  • खाद्य, आहारात पुरेशा पोषक तत्वांचा अभाव किंवा इतर घटक यामुळे  सुद्धा ताण येतो.
  • वजन वाढणे, कमी होणे किंवा वृद्धत्व यासारख्या घटनांमुळे तणाव निर्माण होतो.
  • कोंबड्यांना पकडताना, विशिष्ट औषधे देताना किंवा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेले जाते, तेव्हा त्यांना भावनिक ताण येतो.
  • रोग बरा करण्यासाठी दिलेल्या औषधांमुळे आणि कालावधीमुळे देखील ताण येऊ शकतो

कोंबड्यांचे ताण घालवण्यासाठी उपाय योजना (Measures For Chicken Stress)

  • कोंबड्यांमधील ताण (Stress In Chicken) घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रत्येक कोंबडीला किती जागा लागते हे पाहून आपल्याजवळील उपलब्ध जागेनुसार एकूण कोंबड्यांची संख्या ठरवावी. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेच्या आधारे कोंबडीची एकूण संख्या निश्चित करा
  • लहान जागेत जास्त गर्दी केल्याने वातावरणातील अमोनियाचे प्रमाण वाढते. शिवाय पक्षी एकमेकांच्या सानिध्यात असल्याने रोगाचा प्रादुर्भाव लवकर होतो. यावर उपाय म्हणून लिटरची स्वच्छता करावी.
  • पावसाळ्यात आणि जास्त आर्द्रता असताना लिटर कोरडे ठेवावे. वातावरणातील बदलानुसार शेडमध्ये पडदे लावणे, पोती बांधणे या गोष्टींची वेळेवर काळजी घ्यावी.  
  • ताण घालवणारे औषधे (Chicken Stress Medicine) तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावीत. आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्वांचा पुरवठा केल्यास ताण कमी होतो.
  • कोंबड्यांना ताण (Stress In Chicken) असताना त्यांना लसीकरण करू नये. प्रथम कोंबड्यांवरील ताण कमी करावा आणि नंतरच लसीकरण करावे.
error: Content is protected !!