हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांना मिळणार अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला

शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार होण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत.

यासाठी पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले.

शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानीत दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य, तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा (१० वर्षांआतील व १० वर्षा वरील) प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे.

यासाठी हरभरा पिकांच्या १० वर्षांच्या आतील वाणास २५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे तसेच रब्बी ज्वारी पिकाच्या १० वर्षांवरील वाणास १५ रुपये प्रतिकिलो अनुदानीत दराने बियाणे देण्यात येत आहे. महाबीज, कृभको, राबिनी अमरावती, ‘केव्हीके’मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुकानिहाय हरभरा व ज्वारी पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे.

अनुदानावर पीक प्रात्यक्षिकाचा लाभ

या योजनेत पीक प्रात्यक्षिकातंर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील अत्यल्प किंवा अल्प भूधारकांनी (अपंग, महिला, माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर एका गावातील लॉटरीमध्ये निवड झालेल्या २५ शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर पीक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळू शकेल.

error: Content is protected !!