Success Story : 200 प्रकारच्या आंब्याची शेती; 74 वर्षीय मुशीर खान कमवतायेत लाखो रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम असतो. या काळात मोठ्या प्रमाणात आंब्याची उलाढाल (Success Story) होते. अनेक असे शेतकरी आहेत, की ज्यांच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. या माध्यमातून ते चांगला नफा कमावत आहेत. आज आपण अशीच एक यशोगाथा पाहणार आहोत. एका 74 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात 200 प्रकारच्या आंब्याची लागवड केलीय. मुशीर हसन खान असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या बावर गावातील रहिवासी आहेत. आंबा पिकातून ते दरवर्षी लाखो रुपयांचा (Success Story) नफा कमावत आहेत.

500 क्विंटल आंब्याचे उत्पादन (Success Story Of Mango Farming)

शाहजहांपूरच्या बावर गावातील शेतकरी मुशीर हसन खान यांच्या शेतात 200 हून अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी आंब्यांची बाग (Success Story) आहे. ते बागेतून ते वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. त्यांच्या आंब्याना देश-विदेशात मोठी मागणी आहे. आम्ही गेल्या चार पिढ्यांपासून आंब्याची लागवड करत आहोत. दरवर्षी सुमारे 500 क्विंटल आंब्याचे उत्पादन होते. ज्यातून त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात.

सर्वाधिक लक्ष दशेहरी आंब्यावर

शेतकरी मुशीर हसन खान सांगतात, आपण दरवर्षी 200 विविध प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेतो. आंब्याच्या अनेक जाती आहेत. दशेहरी, चौसा, लंगडा, मल्लिका, तोतापरी, हापूस, सिंधुरा, बंगीनापल्ली, रत्नागिरी, रासपरी, मालदा अशा विविध प्रकारचे आंबे आपल्या शेतात लावलेले आहेत. मात्र, सर्वाधिक लक्ष दशेहरी आंब्यावर आहे. कारण त्याचे उत्पादन येथे अधिक आहे. आंब्याची बहुतांश विक्री ही राजस्थानमध्ये केली जाते. काही व्यापारी थेट शेतात येऊन आंब्याचा व्यवहार करतात.

किती मिळतोय दर

5 ते 10 जून दरम्यान अनेक जातीचे आंबे बाजारात येतात. आमच्या शेतातील आंबे खूप चागले आहेत. देशातील अनेक राज्यांतून आपल्या आंब्याला हंगामात सर्वाधिक मागणी असल्याची मुशीर चाचा यांनी सांगितले. आतापर्यंत आंब्याला 25 ते 30 रुपये किलोचा दर मिळाला आहे. मात्र, यंदा हा आंबा काहीसा महाग होणार आहे. शेतकरी मुशीर हसन खान सांगतात, आपल्या शेतात शुगर फ्री अंबिका आंब्याची लागवड केली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अंबिका आंब्याचे सेवन फायदेशीर ठरते. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दिवसभरात कितीही आंबे खाल्ले तरी तुमची शुगर लेव्हल एक टक्काही वाढणार नाही. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!