Success Story : 20 गुंठे काकडीतून शेतकरी झाला लखपती; घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

Success Story
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सध्या अनेक शेतकरी (Farmer) शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत भरघोस उत्पन्न घेत असल्याचे दिसत आहेत. काही जण तर चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसाय करण्यास प्राधान्य देतात. शेतीत कष्ट करतात आणि लाखो रुपयांचा नफा मिळवतात. त्याचबरोबर काही शेतकरी अगदी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढतात. सध्या देखील अशाच एका शेतकऱ्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने २० गुंठे काकडीतून तब्बल साडेचार लाखांचे उत्पन्न घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

निवृत्ती पुंडलिक पगार असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्यांने २० गुंठे काकडीतून तब्बल साडेचार लाख रुपये कमावले आहेत. याबाबत सांगताना निवृत्ती म्हणाले की, काकडीची लागवड केल्यानंतर ३८ दिवसांनंतर काकडीचे उत्पन्नदेखील सुरू झाले. या काकडीच्या उत्पन्नातून तीन महिन्यांत जवळपास साडेचार ते पाच लाख कमावले आहेत. (Success Story)

आतापर्यंत १५ ते १६ टप्प्यांत जवळपास २५ ते २७ टन पीक निघालेले असुन अजून ५ ते ७ टन उत्पन्न निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. यासाठी त्यांना एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे मात्र यामधून त्यांना साडेचार ते पाच लाख रुपये मिळाले असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आपल्या पिकाला जर योग्य भाव मिळाला तर त्याचे चांगले पैसे होतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना पसुरा कंपनीचे प्रतिनिधी योगेश भदाणे तसेच नांदगाव तालुका कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

Hello Krushi ‘या’ अँपबद्दल माहिती आहे का

शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप आणले आहे. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. या अँपमध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव, सरकारी योजना, हवामान अंदाज पशूंची खरेदी विक्री, त्याचबरोबर जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करा