Success Story : सध्या ड्रॅगन फ्रुटची शेती महाराष्ट्रातील अनेक शेतकरी करत असल्याचे दिसत आहेत. या शेतीमधून चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे वळला असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देखील एका शिक्षकाने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शेतकऱ्याने माळरानावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.
या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित सात एकर जमीन असून त्यापैकी एक एकर जमिनीवर त्यांनी गेल्यावर्षी 10 जून रोजी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. आता यावर्षी या बागेला फळ यायला सुरुवात झाली आहे. ग्यानोबा गंगाधर मजरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग केला आहे. आणि तो यशस्वी देखील झाला आहे त्यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
कसं केलं नियोजन?
मजरे यांनी आपल्या शेतामध्ये 11 बाय 6 फूट याप्रमाणे एक एकर मध्ये 525 सिमेंट पोल रिंग पद्धतीने उभा केले. त्यामध्ये त्यांनी जवळपास 2100 रोपे लावली आहेत. त्यांनी मागच्या वर्षी लागवड केली असून सध्या ड्रॅगन फ्रुटचे फळ देखील सुरू झाले आहे. त्यांनी यासाठी ठिबक सिंचन केले आहे. यासाठी त्यांना अडीच लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे.
ड्रॅगन फ्रुटला किती बाजारभाव मिळतो?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर डाळिंबाचे रोजचे बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ड्रॅगन फ्रुटचे दररोजचे बाजार भाव पाहू शकता. त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील बाजार भाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.
सध्या त्यांची ड्रॅगन फ्रुटची फळे सुरू झाली असून बाजारभावाप्रमाणे हे फळ विकले तर उत्पन्न हे दोन लाख येणार असल्याचे ग्यानोबा गंगाधर मजरे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर यांनी हे फळ थेट नागरिकांकडे जाऊन विकणार असल्याचे देखील सांगितले आह. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोबतच हा यशस्वी प्रयोग केल्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे.