Success Story : शेतकऱ्याने लावली रंगबेरंगी फ्लॉवर; वर्षाला करतोय 15 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये फळभाज्यांची लागवड (Success Story) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. साधारणपणे भाजीपाल्याला बाजारात नेहमीच मागणी असते. त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी फ्लॉवर, कोबी, वांगी भेंडीसह अनेक भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे बाजारात या पिकांना योग्य दर मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई देखील होते. सर्वसाधारणपणे शेतकरी पांढऱ्या फ्लॉवरची लागवड करतात. मात्र, अशातच आता एका शेतकऱ्याने चक्क रंगबेरंगी फ्लॉवरची लागवड केली असून, त्यातून अधिक दर मिळत असल्याने तो वार्षिक 15 लाखांची कमाई देखील करत आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या रंगबेरंगी फ्लॉवर शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

अनेक आजारांवर गुणकारी? (Success Story Colorful Cabbage Planted By Farmer)

राज कुमार चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील चखेलाल गावचे रहिवासी (Success Story) आहेत. राज कुमार याने आपल्या 2 एकर जमिनीमध्ये लाल, पिवळ्या आणि हिरव्या या रंगाच्या फ्लॉवरची लागवड केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ते या रंगबेरंगी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेत असून, त्यांना सामान्य पांढऱ्या फ्लॉवरपेक्षा रंगबेरंगी फ्लॉवरला अधिक दर मिळतो. जो पांढऱ्यापेक्षा नेहमी अधिक असतो. ही रंगबेरंगी फ्लॉवर चवीला खूप उत्तम असून, ती अनेक आजारांवर गुणकारी मानली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किती मिळतोय दर?

राज कुमार चौधरी यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्याकडे सध्या रंगबेरंगी फ्लॉवरच्या तीन प्रजाती आहेत. यामध्ये इंग्लंड, तैवान, जपानी प्रजातींचा समावेश आहे. ज्यांचा रंग लाल, पिवळा, हिरवा आहे. आपण साधारपणे नोव्हेंबर महिन्यात या रंगबेरंगी फ्लॉवरची लागवड करतो. त्यानंतर आपला माल सध्या काढणीला असून, काही व्रिकी झाला आहे. बाजार समितीत आपल्या या रंगबेरंगी फ्लॉवरला दिसताच क्षणी व्यापाऱ्यांचा मोठा ओढा असतो. आपण स्थानिक बाजारपेठेत व्यापाऱ्यांना आपली ही रंगबेरंगी फ्लॉवर विक्री करत असून, त्यास सध्या प्रति किलो 100 ते 120 रुपये दर मिळत आहे.

उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळालाय पुरस्कार

दरम्यान, रंगबेरंगी फ्लॉवरसाठी थोडा अधिक खर्च होत असल्याचे शेतकरी राज कुमार चौधरी सांगतात. मात्र, त्या तुलनेत दरही अधिक मिळतो, असे त्यांनी सांगितले आहे. दर अधिक मिळत असल्याने आपल्याला 2 एकरात एकूण वार्षिक 15 लाखांची कमाई होत असल्याचे ते सांगतात. त्यांना शेतीतील आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 2016 मध्ये पंतप्रधानाच्या हस्ते ‘बेस्ट एग्रीकल्चर परफॉर्मेंस अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते एक प्रगतिशील शेतकरी असून, ते नेहमीच आजच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!