Success Story : द्राक्ष बाग तोडली, पॉलिहाऊस उभारले, दुष्काळात काकडीतून घेतले चांगले उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती होती. मात्र, असे असताना (Success Story) देखील बुद्धी, चिकाटी, नवीन प्रयोग करण्याची क्षमता व कल्पकतेच्या जोरावर राज्यातील काही शेतकऱ्यांनी मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कमी जमीन, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकरी गणपतराव घुमरे यांनी २८ गुंठे पॉलिहाऊसमध्ये (Success Story) काकडीची लागवड केली आहे.

कर्जामुळे तोडली द्राक्ष बाग (Success Story Of Cucumber Cultivation)

विशेष म्हणजे बाजूला दुष्काळ आहे. इतर पिकांना भाव नाही. अशा गर्तेत शेतकरी सापडले असताना बाजारपेठेचे मागणी ओळखून काकडीच्या नवीन वाणाची लागवड (Success Story) करून गणपतराव घुमरे यांनी तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. घुमरे यांच्याकडे पूर्वी द्राक्षाची बाग होती. परंतु द्राक्षाचे अनियमित उत्पादन याशिवाय अस्मानी नाहीतर सुलतानी संकट नेहमीच ठरले होते. यामुळे कर्ज त्यांच्यावरती वाढत गेले.

पिकांमध्ये आणली नाविन्यता

कर्जाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नवीन द्राक्षाची बाग तोडली. त्यांनतर त्यांनी बँकेचे कर्ज काढून २८ गुंठे पॉलिहाउस उभे केले. त्यात गुलाबाची लागवड केली. कर्ज काढून उभे केलेल्या पॉलिहाऊसमध्ये सुरवातीला शिमला मिरची आणि नंतर गुलाबाचे विक्रमी उत्पादन घेतले. यातूनच घुमरे यांनी पॉलिहाऊसचे सर्व कर्ज फेडले. आजही त्यांची शेती नफ्यात आहे.

दिवसाआड निघतायेत 70 ते 100 कॅरेट

दरम्यान, गुलाबाची बाग काढल्यानंतर पुढील परत लागवडीच्या दरम्यान पीक बदलासाठी काय करायचे? हा विचार ते करत असताना, त्यांनी माहिती घेऊन काकडीच्या दोन वाणांची लागवड पॉलिहाऊसमध्ये केली. विशेष म्हणजे या पिकासाठी देखील योग्य व्यवस्थापन करत काकडीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. सध्या या शेतीतून ते 70 ते 100 कॅरेट काकडीचे उत्पादन दिवसाआड घेत आहेत. तर काकडीला अपेक्षित भावही असल्याने उत्पन्नही चांगले मिळत आहे.

पॉलिहाउससाठी 25 लाखांचे कर्ज

शेतकरी गणपतराव घुमरे सांगतात, २०१६ मध्ये आपण द्राक्ष बाग तोडून २५ लाखांचे कर्ज घेऊन पॉलिहाउस तयार केले. सुरुवातीच्या काळात शिमला मिरचीची लागवड केली. नंतर गुलाबाची लागवड केली. पहिली बाग काढल्यानंतर काही दिवस जमिनीत पीक बदलावे लागते. म्हणून काकडी या पिकाची आपण लागवड केली. आधुनिक पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिले. त्यामुळे अतिशय सुंदर व विक्रमी उत्पादन देणारी काकडीची बाग तयार झाली आहे.

error: Content is protected !!