हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीत फारसा फायदा नसल्याचे कारण सांगून अनेक शेतकरी स्वत:ची शेती दुसऱ्याला (Success Story) भाडे तत्त्वावर देतात. स्वत: एखाद्याकडे कमी पगारावर नोकरी किंवा मजुरी करून जीवन जगतात. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील काेरची येथील डाॅ. नंदकिशाेर अंताराम शेंडे हे याला अपवाद ठरत आहेत. त्यांनी चक्क डाॅक्टरकीचा व्यवसाय साेडून शेती कसण्यास सुरुवात केली आहे. तनमनधनाने शेतीकडे लक्ष दिल्याने त्यातून लाखाेंचा नफा मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.
पारंपारिक शेतीला फाटा (Success Story Of Farmer)
नंदकिशोर शेंडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील डीएचएमएस, डीएसीचे प्रशिक्षण (Success Story) घेतले आहे. काही दिवस त्यांनी डाॅक्टरकीचा व्यवसाय केला. त्यांच्याकडे वडिलाेपार्जीत आठ एकर शेती आहे. सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करत होते. मात्र, यात पाहिजे तेवढा नफा मिळत नसल्यामुळे ते २०१५ पासून बागायती शेतीकडे वळले. पाच एकरात फळ व बागायत, तर तीन एकरात धानाची शेती करीत आहे.
किती मिळतंय उत्पन्न?
२०१६ मध्ये पहिल्यांदाच शेतात लावलेल्या खरबुजाच्या चार एकर शेतीतून चार लाखाचा नफा, तर एक एकराच्या कारलीच्या शेतीतून साडेतीन लाख रुपयांचा नफा (Success Story) झाला. तेव्हापासून ते कायमचे बागायती शेतीकडे वळले. सध्या डॉ. नंदकिशोर शेंडे हे शेतामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, कारली आणि खरबुजाचे पीक घेतात. या भाजीपाला नागपूर, गोंदिया व छत्तीसगड राज्यात व्यापाऱ्यांमार्फत पाठविला जाताे. शेंडे यांनी स्वतःचे कृषी केंद्र सुरू केले असून, बियाणे, कीटकनाशके, फवारणी याबाबत शेतकऱ्यांना समजावून सांगतात.
इतर शेतकऱ्यांना करतात मार्गदर्शन
धानाच्या शेतीत फारसा नफा राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळबाग आदी पिकांकडे वळावे, यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे ऐकून अनेक शेतकरी फळबाग शेतीकडे वळले आहेत. याशिवाय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन शेंडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामुळे अल्पावधीतच शेतीमध्ये त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.