Success Story : कोथिंबिरीतून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न; खर्चाचं गणित समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, अस्मानी संकट त्याचबरोबर अवकाळी पाऊस ही अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर सतत येत असतात. मात्र यातून मार्ग काढत शेतकरी शेती करत असतात आणि शेती करून ते भरघोस उत्पन्न देखील मिळवत असतात. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतकरी सध्या जास्त उत्पन्न मिळवत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या शेतीतून लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती समोर आली आहे

अनेकजण आज-काल फळबागा लागवडीकडे वळले आहेत. मात्र या शेतकऱ्याने फळबागेला फाटा देत पालेभाज्या करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे.रमाकांत वळके-पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हे शेतकरी पहिले द्राक्ष, उस यासारख्या फळबागांचे प्रयोग करत होते. मात्र यामधून त्यांना म्हणावा असा आर्थिक नफा मिळत नव्हता त्यांच्या पदरी सतत निराशाच होती. त्यामुळे त्यांनी पालेभाज्या लागवडीचा निर्णय घेतला त्यामुळे मागच्या पाच वर्षापासून रमाकांत वळके-पाटील हे कोथिंबीरीचे उत्पादन (Coriander production) घेत असून त्यांना वर्षाकाठी लाखोंचा नफा मिळत आहे. (Success Story : )

दोन महिन्यात 16 लाख रुपयांचे उत्पन्न

रमाकांत वळके-पाटील हे लातूर जिल्ह्यातील आशिव या गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे जवळपास 20 एकर शेत जमीन आहे. उत्पादन वाढीसाठी त्यांनी ऊस आणि द्राक्ष करण्याचा मागच्या काही वर्षापूर्वी निर्णय घेतला होता. मात्र त्यामधून त्यांना योग्य तो नफा मिळत नव्हता म्हणून त्यांनी त्यानंतर कोथिंबीर लागवडीकडे लक्ष वळवले आणि याच लागवडीतून त्यांना मोठा आर्थिक फायदा देखील झाला आहे. पहिल्या वर्षापासून त्यांनी लाखो रुपयांचा फायदा मिळवायला सुरुवात केली.या वर्षी त्यांना कोथिंबिरीतून १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दोन महिन्याच्या आत आणि कमी खर्चामध्ये त्यांनी 16 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे सगळीकडे त्यांची चर्चा होत आहे.

एकरी वीस हजार रुपयांचा खर्च

रमाकांत वळके पाटील यांच्याकडे 20 एकर क्षेत्र असून त्यांनी पाच एकर क्षेत्रावर कोथिंबीर लावली. त्यामध्ये एक एकर कोथिंबीर लावण्यासाठी वीस हजार रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दीड महिन्याच्या आत ते १६ लाख रुपये पेक्षा जास्त कोथिंबीरीतून कमवतात. यामधून खर्च वजा वजा करून निव्वळ नफा14 लाख रुपये राहतो असे त्यांचे म्हणणे आहे

फळबागांमधून परवडत नाही

शेतकऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, याआधी ते फळबागाची लागवड करत होते मात्र द्राक्ष जोपासताना त्यांना खूप मोठा खर्च होत होता आणि त्यानंतर खर्च देखील काही वेळी माघारी येत नव्हता. त्यांनी प्रत्येक वर्षी फळबागांमध्ये मोठे नुकसान सहन केले. त्यामुळे त्यांनी मागच्या चार वर्षापासून सातत्याने कोथंबीर लागवडीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमवला आहे. कोथिंबीर लागवड करून आलेल्या पैशामध्ये त्यांनी लातूरला घर देखील घेतल्याचे सांगितले आहे.

error: Content is protected !!