हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये (Success Story) शेतीत पारंपारिक पिकांमधुन शेतकऱ्यांना म्हणावा, तसा भाव मिळत नाही. हे पाहून शेतकरी आधुनिक पद्धतीने केळी लागवड करत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील केळीचा दर्जा पाहून, येथील केळीला इराककडून मागणी आली आहे. केळीला भाव चांगला मिळाल्यामुळे, येथील शेतकरी इराकला केली पाठवत आहे. आज आपण हिंगोली जिल्ह्यातील अशाच एका केळी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केळी पिकवलेली दीड एकरातील केळी इराकला पाठवली जात आहे. ज्यांना त्यातून आतापर्यंत तीन लाखांचा नफा (Success Story) मिळाला आहे.
पारंपारिक पिकांना फाटा (Success Story Of Banana Farming)
दिगंबर काळेवार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हिंगोली जिल्ह्यातील वरूड येथील रहिवासी आहेत. शेतकरी दिगंबर काळेवार यांनी दहा वर्षांपासून केळीची लागवड (Success Story) करणे सुरू केले आहे. परंतु यंदा प्रथमच त्यांची केळी सातासमुद्रापार पाठविली जाणार आहे. दहा वर्षांपूर्वी दिगंबर काळेवार हे दरवर्षी कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिके घेत होते. मात्र, काही फायदा होत नाही हे पाहून त्यांनी केळीची लागवड करणे सुरू केले. यातून तरी थोडा बहुत हातभार मिळेल आणि दोन पैसे मिळतील म्हणून केळीची लागवड करणे सुरू केले, असे त्यांनी म्हटले आहे.
दोन एकरावर केळीची लागवड
शेतकरी दिगंबर काळेवार सांगतात, “दोन वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करत आलो आहे. यावर्षी दोन एकरामध्ये केळीची लागवड केली आहे. केळी लागवडीपासून केळीची काढणी करेपर्यंत जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळामुळे केळीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गतवर्षी केळीला ८०० क्विंटल एवढा भाव होता. यावर्षीही ८०० रुपये एवढाच भाव मिळत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्याच्या मानाने इराकला २०० रुपये अधिक म्हणजेच १ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे आपण यंदा केळी निर्यातीचा निर्णय घेतला आहे.”
‘शेतकऱ्यांनी फळशेतीकडे वळावे’
शेती करणे सध्या अवघड होऊन बसले आहे. कापूस, सोयाबीन या पारंपारिक शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून केळीची लागवड केली. केळीची वाढ होण्यासाठी व भरून येण्यासाठी युरिया, पोटॅश, डीएपी, कॅल्शियम, बोरॉन या खताची मात्रा दिली. त्यामुळे केळी भरून आली आहे. इराक या देशात केळी पोहोचली म्हणून त्याचेही समाधान मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनी फळ लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. असे शेतकरी दिगंबर काळेवार यांनी शेवटी म्हटले आहे.