Success Story : कारले, चवळी शेंग, काटवलच्या शेतीतून शेतकरी कमावतोय लाखो रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : आपल्याकडे ज्या त्या भागानुसार पिकांची लागवड केली जाते. मात्र सध्या शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून कोणत्याही भागात कोणतेही पीक घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान भंडारा जिल्हा हा भात पीक उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जातं. मात्र सध्या भात पिकवून पाहिजे तो नफा मिळत नसल्याने अनेक शेतकरी नाविन्यपूर्ण शेती करताना दिसत आहेत. या भात उत्पादक जिल्ह्यातील बरेच शेतकरी आता बागायती शेतकरी बनले आहेत. दरम्यान सुरेश ईश्वरकर या शेतकऱ्याने देखील तीन एकरात बागायती शेती केली असून त्याने फक्त पाच महिन्यात सहा लाखांचे उत्पन्न घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील भुसा टाकळी या ठिकाणचे शेतकरी सुरेश ईश्वरकर यांनी कृषी विभागातील ठिबक सिंचन, ड्रीप या योजनेमधून एक एकरात काटवलीची लागवड केली आहे. त्याचबरोबर अर्धा एकर मध्ये चवळीच्या शेंगा आणि अर्धा एकर मध्ये कारले तर एक एकर मध्ये मिरचीचे उत्पादन घेतल आहे. या सर्वांमधून त्यांना चांगला नफा मिळत असून त्यांनी पाच महिन्यात जवळपास सहा लाखांचे उत्पादन घेतले आहे.

कस केलं नियोजन?

त्यांच्या काटवलीच्या लागवडीबद्दल पाहिले तर त्यांना काटवल लागवड करण्यासाठी फक्त तीस हजार रुपयांचा खर्च आला आहे. सहा दिवसानंतर ते काटवलची तोडणी करतात. सुरुवातीला काटवलला प्रति किलो दोनशे रुपये दर मिळाला आता 160 रुपये प्रति किलो न ते विकले जात असून एका महिन्यात तीनशे किलोची विक्री बाजारात होत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काटवलीची एकदा लागवड केल्यानंतर पुढचे पाच वर्षे त्यामधून उत्पन्न निघत राहते त्यामुळे पुढील चार महिन्यापर्यंत काटवल निघणार असून त्यामधून अजून त्यांना दोन लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

त्याचबरोबर त्यांनी एक एकर मध्ये कारल्याची शेती केली असून त्यासाठी त्यांना 25 हजार रुपयांचं खर्च आला आहे. कारली दिवसाड तोडली जात असून दोन महिन्यांपर्यंत कारले विक्रीसाठी निघणार असल्याचे त्यांचे म्हणणं आहे. यामधून देखील त्यांना नफा 50 हजारांपर्यंत राहण्याच्या अपेक्षा आहे. कारल्यासोबत त्यांनी चवळीच्या शेंगांची देखील लागवड केली आहे यासाठी देखील त्यांना 25000 रुपयांचा खर्च आला असून दोन महिन्यात त्यांना पन्नास हजारांचा नफा मिळणार आहे.

या शेतकऱ्याने मिरचीचे देखील उत्पादन घेतल आहे. एक एकरामध्ये या शेतकऱ्याने मिरचीची लागवड केली असून यासाठी त्यांना तीन लाख रुपयांचा खर्च आला असून पुढील चार महिन्यात अडीच टना पेक्षा जास्त मिरची उत्पादन होईल आणि त्यामधून त्यांना तीन लाखांचा नफा होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. सध्या या शेतकऱ्याच संपूर्ण कुटुंब शेतात काम करत आहे. भाताच्या शेतीतून बागायती शेतीकडे वळल्याने ईश्वरकर यांनी आर्थिक प्रगती साधली आहे त्यामुळे त्यांचे सध्या सगळीकडे कौतुक देखील केले जात आहे

भाजीपाल्यांचे बाजार भाव कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर भाजीपाल्यांचे दररोजचे बाजार भाव पाहिजे असतील तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही दररोजच्या दररोज भाजीपाल्याचे दर पाहू शकता तुमच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याला काय दर मिळतोय? याची देखील माहिती तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलवर मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोर वरून आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!