Success Story : शेतकऱ्याच्या पोराने सचिनलाही टाकले मागे; 13 व्या वर्षीच क्रिकेटसाठी निवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात क्रिकेट या खेळाला एक वलय प्राप्त झालंय. रणजी ते आयपीएल आणि विश्वचषकादरम्यान (Success Story) गावागावात क्रिकेटचीच चर्चा सुरू असते. तुम्हीही शेतकरी असाल तर आज तुमचाही ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. एका शेतकऱ्याच्या 13 वर्षीय मुलाची रणजी क्रिकेटसाठी निवड झाली असून, तो बिहार आणि मुंबई यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यात खेळत आहे. विशेष म्हणजे या शेतकरी पुत्राने क्रिकेट या खेळात पदार्पण करण्यात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या विक्रमवीर सचिन तेंडुलकर (Success Story) यांनाही मागे टाकले आहे.

सर्वात कमी वयाचा खेळाडू (Success Story Farmers Son Selected In Cricket)

सध्या बिहारची राजधानी पटना येथील मोइनुद्दीन स्टेडियमवर बिहार आणि मुंबई या दोन संघांदरम्यान क्रिकेटचे सामने सुरू आहेत. या सामन्यात शेतकरी पुत्र असलेला वैभव सूर्यवंशी हा केवळ 13 वर्षीय खेळाडू खेळत आहे. महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने वयाच्या 15 व्या वर्षी आपला पहिला रणजी सामना खेळला होता. मात्र, वैभव सूर्यवंशी याच्या आधारकार्डच्या माध्यमातून वैभवच्या वयाची पुष्टी करण्यात आली असून, तो तेरा वर्षीय असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तो वर्ष 2000 नंतर सर्वात कमीत वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे.

नामवंत खेळाडूंविरोधात खेळतोय

गर्वाची बाब म्हणजे शेतकरी पुत्र वैभव सूर्यवंशी हा अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि धवल कुलकर्णी या नामवंत खेळाडूंविरोधात रणजी सामना खेळत आहे. वैभव हा डाव्या हाताचा फलंदाज असून, तो बिहारच्या टीमकडून रणजी सामना खेळत आहे. वैभवने रणजी सामन्यांमध्ये निवड होण्याअगोदर मागील वर्षभरात हेमंत ट्रॉफी, विणु मांकड ट्रॉफी आणि काही बिहारमधील ट्रॉफी खेळल्या आहेत. याशिवाय भारताच्या अंडर-19 संघाकडूनही वैभवने क्रिकेट खेळले आहे. त्यानंतर आता त्याची बिहारच्या संघाकडून रणजी सामन्यांसाठी निवड झाली असून, त्याने रणजी सामन्यांमध्ये वर्ष 2000 नंतर सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून पदार्पण केले आहे.

वैभवचे वडील करतात शेती

वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी हे शेतकरी असून, ते बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात शेती करत आपले घर चालवतात. त्यांनी आपल्या मुलाची क्रिकेट खेळातील रुची पाहून वयाच्या 5 व्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले आहे. यासाठी त्यांनी त्याला प्रथम समस्तीपुर आणि नंतर पटना येथे क्रिकेटचे धडे गिरवण्यास पाठवले. त्यामुळे आता वैभव आणि त्याच्या वडिलांच्या मेहनतीला फळ येणे सुरू झाले असून, गेल्या वर्षभरापासून वैभव क्रिकेट खेळात चांगले नाव कमावत असल्याचे वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. वैभव हा विस्फोटक फलंदाज असून, त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या टूर्नामेंटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता तो रणजी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून लवकरच भारतीय टीममध्ये देखील स्थान मिळवेल, असा विश्वासही वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!