Success Story : शेतकऱ्यांनी जर बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास केला आणि जर बाजारपेठेचा अभ्यास करून शेती केली तर त्यामधून त्यांना चांगली कमाई करता येते. सध्या अनेक युवा शेतकरी असे आहेत जे बाजारपेठेचा नेमका अभ्यास करतात आणि मगच पिकांची लागवड करतात. यामधून त्यांना चांगला फायदा देखील होतो. सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरची लागवड करताना दिसत आहेत. मागच्या वर्षी मिरचीला म्हणावा तसा हमीभाव मिळाला नाही मात्र आता यावर्षी मिरची पिकातून शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत.
जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील एका शेतकऱ्याने अवघ्या तीन महिन्यातच मिरचीच्या पिकातून 55 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होत आहे. इक्बाल पठाण असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मागच्या सोळा वर्षापासून मिरचीची लागवड करत आहेत. प्रत्येक वर्षी त्यांची या पिकातून कमाई चांगली झाली असे नाही मात्र योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यातच 55 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
या वाणांची केली लागवड
कोणत्याही पिकाची लागवड करताना योग्य वाणांची निवड करणे खूप गरजेचे असते. जर योग्य वाणांची निवड केली तर यामधून उत्पन्न देखील चांगले मिळते यावर्षी. या शेतकऱ्याने एकूण 11 एकर शेतात मिरचीची लागवड केली होती त्यांनी एप्रिल महिन्यात मिरचीचे शिमला पिकाडोर, बलराम आणि तेजा यांसारख्या वाणांची लागवड केली होती. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाणांची बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांनी मिरचीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
किती केली कमाई?
जर मिरचीच्या शेतीतून कमाई बद्दल बोलायचे झाले तर शिमला मिरची 40 ते 45 रुपये प्रति किलो बलराम वाणाच्या मिरचीला ७१ रुपये प्रति किलो आणि पिकाडोर मिरचीला 65 रुपये प्रति किलोचा भाव या शेतकऱ्याच्या मिरचीला मिळाला त्यामुळे आतापर्यंत या शेतकऱ्याने जवळपास 50 लाख रुपये कमावले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे अजून मिरची शिल्लक असून त्यांना लाखोंची कमाई करता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे