Success Story: वस्त्रोद्योग अभियंता ते आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक; हर्षल जैन यांचा भन्नाट आणि प्रेरणादायी प्रवास!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी (Success Story), म्हणजेच लाइफ सेटल झाली. अजून काय हवं असते? बहुतेक सर्वसामान्य लोकांसाठी हेच सर्वात मोठं स्वप्न असते.

परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्यांना एक टप्पा गाठल्यानंतर नवीन क्षितिजे खुणावत असतात. काहीतरी नवीन करण्याच्या ध्यास मनाशी बाळगून ते नवनवीन गोष्टी शिकत असतात. आणि यातूनच त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सुद्धा गवसते (Success Story).

असच काहीतरी घडलं आहे नांदेड येथील आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक (International Organic Inspector) श्री. हर्षल जैन (Harshal Jain) यांच्या बाबतीत.

मुळचे नांदेड येथील हर्षल जैन यांनी त्यांचे  शालेय शिक्षण नांदेड येथील गुजराथी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर बारावी सायन्स झाल्यानंतर अमरावती विद्यापीठातून वस्त्रोद्योग शाखेतून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतले. परंतु फक्त यावर समाधानी न राहता पदवीनंतर त्यांनी लेबर लॉ, एमबीए तसेच सीओएफ म्हणजेच सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण हे अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केले (Success Story).

परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे घरच्यांच्या इच्छेनुसार त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. 2001 ते 2010 या काळात आंतरराष्ट्रीय एक्सपोर्ट मध्ये बॉम्बे डाईंग, बिर्ला टेक्सटाईल या नावाजलेल्या कंपन्यांत त्यांनी वेगवेगळे कार्यभार सांभाळले. सिंगापुर येथे आंतरराष्ट्रीय कंपनीत तांत्रिक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केले आहे (Success Story).

असं परफेक्ट आयुष्य सुरू असताना सुद्धा त्यांना ओढ होती ती मायभूमीची आणि कुटुंबाची. यामुळेच एक दिवस पक्का निर्णय घेऊन ते भारतात परत आले.

परंतु आता त्यांना नोकरी करायची नव्हती. त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा होती. पण काय करावे सुचत नव्हते. पुण्यातील एका कंपनी मार्फत जर्मनी व इटली येथे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय मानके या प्रशिक्षणासाठी (Organic Farming Training) जाऊन त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून बिहार मधील शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय शेती (Organic Farming Certification) व प्रमाणीकरण कार्यक्रम राबविला (Success Story). यावेळी बिहार राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न आणि देशातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या यामुळे ते विचलित झाले. शेतकर्‍यांचे हाल त्यांना बघवत नव्हते. आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला हवे हे मनातून त्यांना वाटत होते. यासाठी आता आपले कार्यक्षेत्र बदलण्याची वेळ आली असे त्यांनी ठरविले, यातूनच 2014 साली जन्म झाला तो ‘जी नेक्स्ट ऑरगॅनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेसचा’ (GNext Organics Sales & Services).

सेंद्रिय सेवा केंद्र (Organic Service Center) सुरू करण्याचा निर्णय अंमलात तर आणला, परंतु पुढची वाटचाल जास्त अवघड होती. शेतकर्‍यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल असलेले अज्ञान आणि भीती यामुळे याकडे वळण्यास शेतकरी तयार नव्हते. परंतु त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही आणि परिस्थिती हळूहळू बदलत गेली (Success Story).

रासायनिक शेतीमुळे देशाचे कसे नुकसान झाले आहे आणि सेंद्रिय शेती कशा प्रकारे काळाची गरज आहे हे हर्षल जैन शेतकर्‍यांना पोटतिडकीने समजावून सांगतात.

जी नेक्स्ट ऑरगॅनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेस या त्यांच्या सेवा केंद्राद्वारे हजारो शेतकर्‍यांना ते सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित करत आहेत (Success Story) . महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यातील 30 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांना त्यांनी सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

सध्या नांदेड सोबतच परभणी, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत.

नांदेड जिल्ह्यात 34 सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गट हर्षल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. डाळवर्गीय पिके,फळे, धान्य, तेलबिया, हळद आदी शेती मालाचे प्रमाणिकरणाचे काम श्री. हर्षल जैन यांनी केले आहे.

सध्या हर्षल जैन हे विविध ५ मान्यताप्राप्त प्रमाणीकरण संस्थांद्वारे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण निरीक्षक म्हणून काम पाहतात. जी नेक्स्ट ऑरगॅनिक सेल्स व सर्विसेसद्वारे जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या अनेक शेतकर्‍यांना राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय सेंद्रिय संमेलन, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी मेळावे व प्रत्यक्ष सेंद्रिय शेतीच्या ठिकाणी भेट, अभ्यास दौरे अशा अनेकविध उपक्रमात त्यांनी प्रत्यक्ष सहभागी करून घेतले आहे.

देशातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य सिक्किम येथील पश्चिम व पूर्व भागातील सहा हजार शेतकर्‍यांना सेंद्रिय मालाची तपासणी व प्रमाणीकरण करण्याचे काम श्री. हर्षल जैन यांनी केले आहे (Success Story).

पुरस्कार आणि सन्मान (Success Story)

हर्षल जैन यांचे सेंद्रिय शेती प्रचार आणि प्रसार, प्रमाणीकरण या कार्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. 

2011 मध्ये केंद्र शासनाचा “जैविक इंडिया अवॉर्डने ते सन्मानित झाले आहेत.

2012 मध्ये बिहार सरकारकडून कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल सुद्धा त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

‘मराठवाडा एक्सलेन्स’ – दैनिक सकाळ , दैनिक उद्याचा मराठवाडा, नाशिक येथे राज्यस्तरीय ‘कृषी प्रेरणा’ पुरस्कार (२०२३) असे अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांना लाभले आहेत.  

जैविक भारत संस्थेचे तसेच अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

प्रेरणादायी आयुष्य  

हर्षल जैन हे सेंद्रिय शेतीमालाच्या प्रमाणीकरणाच्या कामात मिळणाऱ्या मिळकतीचा 70 टक्के हिस्सा शेतकर्‍यांना मार्गदर्शन, अडचण ग्रस्त शेतकर्‍यांना अर्थ सहाय्य, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत तसेच अनेक गरजू लोकांना/युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करतात. अनेक युवकांना प्रशिक्षित करून विविध कंपन्यांमध्ये त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीसुद्धा केली आहे (Success Story).

पर्यावरण रक्षण करताना, जैवविविधता जोपासणे, युवकांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे कार्य अनेकांना प्रेरित करत असेल यात शंकाच नाही. परंतु हर्षल जैन यांचे निस्वार्थी जीवन आणि आचरण हे आजच्या समाजासाठी एक उत्तम उदाहरण आहे.

error: Content is protected !!