Aloe vera farming success story : आपल्याकडे बरेच लोक शेतीमध्ये काही नाही म्हणून चांगली नोकरी करतात तर काही असे देखील लोक आहे जे सरकारी नोकरी सोडून शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. पारंपारिक पिकांऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवड केल्यास लाखो रुपयांची कमाई काही वेळातच होऊ शकते. देशातील काही भागात शेतकरी औषधी पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांनी औषधी वनस्पतींच्या लागवडीत चांगला नफा मिळवला आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्याने सरकारी इंजिनिअरची नोकरी सोडून कोरफडची शेती केली.
जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
नोकरीत मन लागत नव्हते
राजस्थानमधील एका शेतकऱ्याने सरकारी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. हरीश धनदेव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हा शेतकरी पूर्वी सरकारी अभियंता होता. त्यांची पोस्टिंग जैसलमेर नगरपरिषदेत कनिष्ठ अभियंता या पदावर होती. पण नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते म्हणून त्यांनी ही नोकरी सोडून गावात येऊन कोरफडीची शेती (Aloe vera cultivation) करण्यास सुरुवात केली. यातून त्याला खूप चांगले उत्पन्न मिळाले. आज तो कोरफडीची शेती करून चांगली कमाई करत आहे आणि करोडपती झाला आहे.
रोपे कुठून विकत घ्यावीत?
शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील कोरफड किंवा अन्य काही पिकांच्या लागवडीचा विचार करत आहात? मात्र याची रोपे कुठे मिळतील याची तुम्हाला माहिती नाही ? तर आम्ही तुमच्यासाठी एक खास बनवले आहे. ज्याचं नाव आहे आहे Hello Krushi ॲप यामध्ये तुम्हाला तुमच्याजवळ घराजवळ किंवा गावाजवळ कोणती रोपवाटिका आहे? याची माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणाहून रुपये मागू शकता. ही संपूर्ण माहिती अगदी तुम्हाला मोफत मिळेल. त्यामुळे लगेच प्ले स्टोअर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टॉल करा.
120 एकर जमिनीवर कोरफडीची लागवड
याबाबत माहिती देताना हरीश सांगतात की, दिल्लीत एका कृषी प्रदर्शनाला गेल्यानंतर हरीश यांचा नोकरीबाबत भ्रमनिरास झाला आणि त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी शेतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर, गावी येऊन त्यांनी जवळपास 120 एकर जमिनीवर कोरफडीची लागवड सुरू केली. राजस्थानमधील बरेच शेतकरी बाजरी, मका आणि गहू या पिकांची लागवड करतात. मात्र हरीश यांनी औषधी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना शेतकरीच नाही तर उद्योजक म्हणून ओळखले जाते.
माहितीनुसार, हरीश धनदेव हे कोरफड, बार्बी डेनिस या एकाच जातीची लागवड करतात, परदेशातही या जातीची मागणी वाढत आहे. बार्बी डेनिस एलोवेरा लक्झरी कॉस्मेटिक्स उत्पादनांमध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. त्यामुळे त्यांनी या जातीचा वापर केला आहे. (Success Story)
वर्षाला 2 ते 3 कोटींची कमाई
हरीशने जैसलमेर जिल्ह्यातच नॅचरल अॅग्रो नावाने स्वतःची कंपनी उघडली आहे. हरीशने 80,000 कोरफडीच्या रोपांसह शेती सुरू केली. आता त्यांच्या शेतात कोरफडीची लाखो रोपे लावली आहेत. धनदेव थेट पतंजलीला कोरफडीचा पुरवठा करत आहेत . त्याचा कंपनीला खूप फायदा होत आहे. आता धनदेव ग्लोबल ग्रुप चालवत आणि जगभरात कोरफड निर्यात करणारा करोडपती शेतकरी बनले आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 2-3 कोटी रुपये आहे.
महाराष्ट्रातही शेतकरी करतायत कोरफड शेती
कोरफडीच्या शेतीतून आपल्या महाराष्ट्रातही अनेक शेतकरी मोठा नफा कमवत आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील रोहणी या गावातील खेमराज भुते नावाच्या एका तरुणाने ३ एकर शेतात कोरफड लागवड केली आहे. यांनतर आता त्याने गावातच कंपनी सुरु केली असून त्याच्या कोरफडीला बाहेरील देशातही मोठी मागणी होत आहे. यामधून खेमराज महिना ३ लाख कमवत असल्याचं सांगतात.
1 Year Green Aloevera Contract Farming Services, For Medicinal, 1-5 Acre
Product Specification
Land Area | 1-5 Acre |
Color | GREEN |
Land Location | All Over India |
Usage/Application | Medicinal |
Service Duration | 1 Year |
Other Necessities | Well Watered, Full Sun Exposure, Fast Growth, PLANT |
Brand | No |
Start Date / Month | June-July,Sep-Oct,march-April |
Language Type | Hindi,English |
Learning Material | Wet |
Material | Fresh Leaf |
Organic | yse |
Minimum Order Quantity | 13000 Plant |
Year of Establishment2007
Legal Status of FirmLimited Company (Ltd./Pvt.Ltd.)
Nature of BusinessManufacturer
Number of Employees11 to 25 People
Annual TurnoverRs. 50 Lakh – 1 Crore
IndiaMART Member SinceFeb 2017
GST08AAOCA7653C1ZJ
Established as a Pvt.Limited Company firm in the year 2007, we “Amritanjali Ayurved (Opc) Private Limited” are a leading Manufacturer of a wide range of Medicinal Seeds, Medicinal Herbal Powder, etc. Situated in Udaipur (Rajasthan, India), we have constructed a wide and well functional infrastructural unit that plays an important role in the growth of our company. We offer these products at reasonable rates and deliver these within the promised time-frame. Under the headship of “Mr. Shubham Patel” (Owner), we have gained a huge clientele across the nation.