हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला तरुण शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना (Success Story) दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या शेतीमध्ये केळी पिकातून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखाना ब्लॉकचे रहिवासी तरजन सिंह यांनी केळी शेतीचा हा यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने केळीची लागवड (Success Story) करुन, त्यांनी वार्षिक 13 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
दीड हेक्टरमध्ये 5500 केळीची रोपे (Success Story Of Banana Farming)
शेतकरी तरजन सिंह हे अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखाना ब्लॉकमध्ये राहतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते केळीची लागवड करत आहेत. वर्षाला 13 लाख रुपये एवढी मोठी कमाई करुन, त्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे. तरजन सिंह यांनी दीड हेक्टरमध्ये 5500 केळीची रोपे लावली होती. एका रोपाची किंमत सुमारे 19 रुपये आहे. अमेठीतीली जैन कंपनी केळीची चांगली रोपे पुरवते.
किती मिळतंय उत्पन्न?
केळीची लागवड त्यांनी सेंद्रिय पद्धतीने केली आहे. केळीची विक्री ते गौरीगंज आणि अमेठीच्या स्थानिक बाजारात करतात. तर बाहेरुन आलेले व्यापारी देखील केळीची खरेदी करत असल्याचे तरजन सिंह यांनी सांगतात. आपल्याला केळी बागेच्या लागवडीसाठी 3.30 लाख रुपये खर्च आला आहे. ज्यातून यंदा आपल्याला वार्षिक 1.5 हेक्टरमध्ये 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
‘केळी शेती फायद्याची‘
दरम्यान, शेतकरी तरजन सिंह सांगतात, केळीची शेती ही फायदेशीर शेती आहे. ही शेती योग्य वेळी मेहनत करुन केली तर त्याचा फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीने केळीची लागवड केली आहे. तसेच केळीच्या लागवडीत शेणखताचा वापर केला आहे. यासोबतच वेळोवेळी कीटकनाशकांचा वापर केला आहे. जेणेकरून पीक रोगमुक्त राहिले. केळीच्या बागेसाठी योग्य पाण्याचे नियोजन केले होते. ड्रीप सिस्टीमद्वारे पाण्याचे व्यवस्थापन केल्याने फायदा झाल्याचे सिंह यांनी शेवटी म्हटले आहे.