Success Story : दुष्काळी पट्ट्यात सीताफळ बाग फुलवली; करतायेत लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शेतकरी (Success Story) काहीतरी नवीन करताना दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता यावर मात करून, शेतकरी सध्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून फळबाग शेती उभारत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना फळबाग शेतीतून मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान गावचे युवा शेतकरी बाबुराव लक्ष्मणराव कोटकर यांनी देखील असाच काहीसा प्रयोग करत सीताफळ शेती यशस्वी केली आहे. आज आपण बाबुराव यांच्या सीताफळ शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पाण्याच्या नियोजनावर भर (Success Story Of Custard Apple Farming)

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव (Success Story) तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पारंपारिक पिकांमधुन उत्पादन खर्चही निघत नसल्याने, 2016 मध्ये बाबुराव यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या शेतीमध्ये एक एकरात पंनी तलाव उभारला आहे. त्याद्वारे त्यांनी वर्षभर पाण्याचे सुयोग्य नियोजन करून, सीताफळ बाग फुलवली आहे. यासाठी त्यांनी 2016 मध्ये एम. एन. के. गोल्डन सिताफळाच्या जातीची आठशे रोपे उपलब्ध करून, ती आपल्या एक हेक्टर शेतीमध्ये लागवड केली आहे. यासाठी त्यांनी दोन झाडांमधील अंतर 14 बाय 8 इतके ठेवले आहे.

बागेत आंतरपिकांची लागवड

आपल्या सीताफळ बागेला पाणी देण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर ते करत असून, सुयोग्य पाणी नियोजनातून ते आपल्या बागेचे संगोपन करत आहे. याशिवाय ते आपल्या सीताफळ बागेतील आतील मोकळ्या जागेत सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करत आहेत. 2016 मध्ये लागवड केल्यानंतर मागील चार वर्षापासून त्यांना सीताफळ बागेपासून उत्पादन मिळत आहेत. यातून सध्या त्यांना लाखोंचे उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात.

राज्यासह परराज्यात विक्री

बाबूराव आपल्या शेतातील उत्पादित सीताफळे महाराष्ट्रासह राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवत आहेत. ते आपली सीताफळे प्रामुख्याने राज्यातील मुंबई, पुणे, वाशी येथील बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. परराज्यातूनही मोठी मागणी असल्याने ते आपली सीताफळे हैदराबादसह देशातील अन्य बाजारांमध्ये देखील पाठवत आहेत. सीताफळाला दरही चांगला मिळत असल्याने आपल्याला यातून लाखोंची कमाई होत असल्याचे तरुण शेतकरी बाबुराव सांगतात.

फळ काढणीसाठी विशेष काळजी

हिंगोली या आपल्या जिल्ह्यातून दूरच्या बाजारात माल पाठवत असल्याने ते फळ काढणीसाठी विशेष काळजी घेतात. ते आठ ते दहा दिवस माल टिकून राहील या हिशोबाने आपल्या फळांची काढणी करतात. त्यांच्या सीताफळाची टिकवण क्षमता देखील चांगली असल्याने त्यांना गुणवत्तापूर्ण उत्तम मिळते. सीताफळ लागवडीसाठी त्यांना राज्य सरकारकडून सरकारी अनुदान मिळाल्याचे ते सांगतात. सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन राज्यातील तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी, असे आवाहन ते नवयुवक शेतकऱ्यांना करत आहेत.

error: Content is protected !!