हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालन (Animal Husbandry) हा शेतीला सर्वात फायदेशीर (Success Story) ठरणारा जोड व्यवसाय आहे. परंतु हा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर योग्य व्यवस्थापन आणि मेहनतीची गरज असते. आज आपण अशा शेतकर्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी जिद्द व प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शेतीला जोडधंदा (Agri Business) म्हणून आपल्या शेतात 15 म्हशींचा प्रकल्प उभारला असून, आज ते या व्यवसायातून महिन्याला लाख ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. दुग्ध व्यवसायातून (Dairy Business) व्यवसायातून लाखोचे उत्पन्न कमावणारा (Success Story) हा तरुण शेतकरी आहे, धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राहुल कल्याणराव पाटील.
राहुल पाटील (Rahul Patil) यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात राहुल हे सर्वांत लहान सदस्य असून, त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्या प्रमाणे सुरुवातीला एक म्हैस विकत घेऊन व्यवसायाला सुरवात केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्यांना या व्यवसायात आवड निर्माण झाली. यानंतर एकेक करून एकूण 15 म्हशी विकत घेऊन पूरक दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. म्हशीचे योग्य संगोपन करण्यासाठी स्लॅबचा गोठा तयार केला. 15 म्हशींच्या माध्यमातून सकाळ आणि संध्याकाळ मिळून 100 लिटर दूध निघते (Success Story).
म्हशींचा हा प्रकल्प उभारणीसाठी त्यांना एकूण 20 लाखापर्यंत खर्च आला. या व्यवसायात राहुल पाटील यांना त्यांचे दोन भाऊ सहकार्य करतात. सकाळी 4 वाजता दूध काढण्यापासून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात होते. यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत सर्व ग्राहकांपर्यंत हे दूध पोहोचविले जाते. जवळपास 100 ग्राहकांना सकाळी आणि संध्याकाळी हे दूध घर पोहोच दिले जाते.
या व्यवसायापासून त्यांना महिन्याला 1 ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत असून (Success Story), महिन्याला पन्नास ते साठ हजारापर्यंत त्यांना खर्च करावा लागतो.
म्हशीच्या शेणापासून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न
15 म्हशीच्या संगोपनातून प्रत्येक महिन्याला 4 ट्रॅक्टर आणि वर्षाकाठी जवळपास 50 ट्रॅक्टरपर्यंत शेणखत (Manure) जमा होते. शेणखताला मागणी भरपूर असल्यामुळे एक ट्रॅक्टर पाच हजारापर्यंत विकला जातो. त्यातून त्यांना वर्षाकाठी 2.5 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळते (Success Story).
संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming)
पाटील कुटुंबाकडे असलेल्या पाच एकर शेतीत पारंपरिक पिके घेतली जातात. म्हशीच्या संगोपनासाठी लागणार चारा म्हणजेच मका, गवत, कडबा, भुसकट यासाठी ते शेतात सोयाबीन, मका, ज्वारी अशी पिके घेतात. ही शेती करण्यासाठी ते खत न वापरता म्हशींच्या शेणाचा (Organic Manure) वापर खत म्हणून करतात (Success Story).