Success Story: गायी चरायला नेणारा गुराखी ते जागतिक डेअरी उद्योजक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आपण जन्म कोणत्या घरी घेतो हे आपल्या हातात नसते (Success Story) परंतु आपले नशीब घडवणे हे मात्र आपल्या हातात असते. काहीजण स्वतःच्या मेहनतीने नशीब आणि भविष्य सुद्धा बदलतात. अशीच एक प्रेरणादायी कथा (Success Story) आहे रमेश रुपारेलियाची (Ramesh Ruparelia).

रमेशचा जन्म गरिबीत झाला होता, वयाच्या नऊव्या वर्षी त्यांचा खडतर मार्ग सुरू झाला आणि या लहान वयातच गाई चरण्यासाठी नेण्याचे काम (Cow Herder) त्याला करावे लागायचे. यासाठी महिन्याला मिळायचे फक्त 80 रुपये. रमेश आठवड्यातील एका दिवस फक्त शाळेत जात असे.

जसजसे रमेश मोठे होत गेले तसतसे गरिबीची पकड जास्त घट्ट होत गेली. त्यामुळे उपजीविकेसाठी वेगळे काम शोधण्यास भाग पाडले. आपल्या अनुभवावर आधारित व्यवसाय करायचे त्यांनी ठरविले.  यासाठी एका गायीभोवती लक्ष केंद्रित करून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. शेण आणि गोमूत्र यांचा नैसर्गिक खत म्हणून वापर करून त्यांनी नापीक जमिनीचे सुपीक भूखंडात रूपांतर केले (Success Story).

हळूहळू सेंद्रिय पद्धतीतून हळूहळू उत्पन्न वाढवत त्यांनी उल्लेखनीय 35 लाख रुपयाचे उत्पन्न (Success Story) कमवले. तेव्हा सर्व मिडियाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.    

जागतिक उद्योजक बनण्याची कथा (Success Story)

यशाने प्रेरित होऊन रमेश यांनी पशुपालन (Dairy Farming) व्यवसाय वाढवत तूप उत्पादनात (Ghee Production) पाऊल टाकले. पारंपारिक पद्धतींचा लाभ घेत 40 तुपाच्या 40 विविध प्रकारांची निर्मिती केली (Dairy Entrepreneur). त्यांची उत्पादने शुद्धता आणि प्रमाणित यासाठी प्रसिद्ध आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरातील 150 देशांमध्ये त्यांची उत्पादने विकली जातात. आज त्यांची मासिक उलाढाल 50-80 लाख रुपये आहे (Success Story).

सहकारी शेतकर्‍यांच्या यशासाठी कटिबद्ध

रमेशची दृष्टी वैयक्तिक यशापलीकडे आहे. सहकारी शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी सुद्धा ते कटिबद्ध आहेत. त्यांच्या पंचवार्षिक योजनेत प्रत्येकी 20 गायी असलेल्या 100 तरुणांची सोय करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. कॉर्पोरेट कर्मचार्‍यांपेक्षा स्वतंत्र शेतकरी उद्योजक बनण्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास आहे.

मर्यादित संसाधने असलेला एक अशिक्षित तरुण रमेश यांनी दृढनिश्चय, जनसंपर्क कौशल्ये आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर आजचे हे यश मिळविले आहे. त्यांना व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा व्यवसाय खराब करण्यासाठी फसव्या डावपेचांचा अवलंब केला, परंतु मेहनतीने रमेश हे यशस्वी (Success Story) झाले आहेत.

फक्त 1 गाय आणि 2 म्हशी घेऊन त्यांनी आपला प्रवास सुरू केला. गायींवरचे त्यांचे प्रेम आणि जनसंपर्काची हातोटी यामुळे त्यांना प्रवासात मदत झाली. ते म्हणतात, “अडथळे सर्वत्र असतात, तुम्ही कशासाठी उभे आहात यावर तुमचा विश्वास असला पाहिजे”.

डेअरी फार्मिंगसाठी समग्र दृष्टीकोन

रमेशच्या यशाचे केंद्रस्थान म्हणजे गायींबद्दलचा त्यांचा मनात असलेला खोलवर आदर. त्यांच्या  “सुपर नंदी” फार्मवर गायींवर अत्यंत सावधगिरीने उपचार केले जातात, त्यांना मुक्तपणे संचार करू दिले जाते. पारंपारिक देसी खाद्याचे त्यांना पोषण दिले जाते. तूप निर्मिती करताना जुन्या पद्धतींचे पालन करून, उत्पादनाची शुद्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित केली जाते.

नवीन योजना

तुपा व्यतिरिक्त, रमेश हे अगरबत्ती, मिलेट, साबण आणि च्यवनप्राश यासारखी उत्पादने सुद्धा तयार करतात. पॅसिफिक मॉल, द्वारका येथे त्यांनी एक स्टॉल लावला असून, त्याची आणि इतर शेतकर्‍यांची उत्पादने विक्री केली जाते. वेबसाइट, यूट्यूब आणि फेसबुक चॅनेलसह त्याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांच्या मदतीने ते जागतिक स्तरावर पोहचले आहेत (Success Story).

रमेश यांची यशोगाथा असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. योग्य मानसिकता आणि कठोर परिश्रमाने कोणीही आव्हानावर मात करू शकतो आणि यशस्वी उद्योग उभारू शकतो हे सिद्ध करते.

error: Content is protected !!