हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रकारच्या फवारणी यंत्रांचा (Success Story) वापर केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान मदतीने शिक्षित तरुणही शेतकऱ्यांसाठी हळूहळू विविध प्रकारचे फवारणी यंत्रांचे मॉडेल विकसित करत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव येथील योगेश गावंडे यांनीही शेती उपयोगी अशी फवारणी यंत्रे बनवली आहेत. ज्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक फवारणी (Success Story) करणे शक्य होत आहे.
योगेश गावंडे यांनी इंजिनिअरिंचे शिक्षण (Success Story) घेतले असून, त्यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. ही शेती वडील सांभाळतात. ते प्रामुख्याने कपाशी, तूर, सोयाबीन तसेच मोसंबीसारखे पिके घेतात. मात्र शेतीतील वडिलांचे कष्ट पाहून योगेश यांनी आपल्या शिक्षणाचा वापर सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये करण्याचा निर्धार केला. त्यानुसार शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असल्याने, योगेश यांनी शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या पिकांवर फवारणी कशी करता येईल? यासाठी काही फवारणी यंत्रांची निर्मिती केली आहे.
ही आहेत फवारणी यंत्रे (Success Story Of Engineering Student)
1- मानवचलित फवारणी यंत्र – हे फवारणी यंत्र चालवण्यासाठी माणसाला आपली ऊर्जा खर्च करावी लागते. या फवारणी यंत्रांची क्षमता 24 लिटरची असून, त्याची किंमत दहा हजार रुपये इतकी आहे.
2- बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र – या फवारणी यंत्राला बॅटरी देण्यात आली असून, मोटरच्या माध्यमातून हे कार्यान्वित होते. या फवारणी यंत्राची किंमत बारा हजार रुपये आहे.
3- टू-इन-वन फवारणी यंत्र – हे फवारणी यंत्र हे मानवी शक्ती व बॅटरी अशा दोन्ही माध्यमातून कार्यान्वित होते. फवारणी सुरू असताना कधीकधी चार्जिंग संपते आणि शेतकऱ्यांना अर्धवट फवारणी सोडून यावे लागते. अशा वेळी शेतकऱ्यांना आपल्या मानवी शक्तीच्या साह्याने हे यंत्र चालवत काम पूर्ण करता येते. या यंत्राची किंमत 14 हजार रुपये आहे.
4 – इंजिन चलित पंप – या फवारणी यंत्रामध्ये 2 HP इंजिनची शक्ती यंत्राला देण्यात आली आहे. परिणामी ते चालवणे अधिक सोपे जाते. आंब्यासारख्या उंच फळ झाडांवर या यंत्राच्या साहाय्याने फवारणी करणे सोपे जाते. या यंत्राची किंमत तीस हजार रुपये आहे.
5- सौर ऊर्जेवरील यंत्र – या यंत्राला सौर ऊर्जेच्या माध्यमातून कार्यान्वित केले जाते. एखाद्या वेळी जर काही एकर क्षेत्राची फवारणी करत असताना, बॅटरी संपण्याची शक्यता असते, मात्र सौरऊर्जेवरील हे यंत्र किमान पाच तासापर्यंत काम करू शकते.
या फवारणी यंत्रांची वैशिष्ट्ये
यातील बहुतेक यंत्र एका चाकावर चालणारे असून, यामधील मानवचलित कुठल्याही प्रकारचे इंधनाची गरज नाही. सुमारे 40 मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राचे फवारणी शक्य होते. यंत्रांच्या माध्यमातून तुम्ही उभे आणि आडव्या अशा दोन्ही पद्धतीने फवारणी करू शकतात. उंच मांडव असलेल्या वेलवर्गीय पिकांमध्ये देखील आरामात फवारणी करता येणे शक्य आहे. तसेच काही पिकांची उंची पाच ते सहा फूट असते अशा पिकांमध्ये देखील फवारणी करता येते. या यंत्रांच्या माध्यमातून कापूस, सोयाबीन तसेच हळद, आले, मिरची, टोमॅटो, कोबी तसेच फ्लावर आणि भेंडी सारख्या पिकांवर फवारणी करू शकतात.
(योगेश गावंडे 7350899801)