Success Story : जालन्यात शेतकऱ्याची यशस्वी अंजीर लागवड; पहिल्याच वर्षी बंपर कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक पिकांच्या लागवडीतून होणार तोटा पाहता सध्या शेतकरी नवनवीन पिके घेत अर्थार्जन (Success Story) करण्यावर भर देत आहे. राज्यातील जालना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्यानेही असाच काहीसा प्रयोग केला असून, त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे. जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावचे तरुण शेतकरी राहुल खोसे यांनी अंजीरची लागवड केली असून, त्यातून त्यांना पहिल्याच वर्षी आतापर्यंत एक ते दीड लाख रुपयांचा नफा (Success Story) मिळाला आहे. सध्या अंजीर विक्री सुरु असून, आपल्याला एकरी 5 ते 6 सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तरुण शेतकरी राहुल खोसे यांनी मोठ्या हिमतीने अंजीर लागवड (Success Story) करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी 2021 मध्ये अंजिराची 230 रोपे आणली. ही रोपे लागवड करण्याअगोदर त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने 12 बाय 15 अशा अंतरावर खड्डे खणले. या खड्ड्यांमध्ये त्यांनी कुजलेले शेतखत, पालापाचोळा यांचा एक थर दिला. तसेच अंजिराची लागवड करताना 10 किलो खाद, 10 किलो शेणखत आणि 5 किलो वर्मी कंपोस्ट खत असे प्रमाण ठेवले. त्यासोबतच अंजीर पिकावर उनीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडी दरम्यान त्यांनी खोदलेल्या खड्यांमध्ये योग्य त्या प्रमाणात चापमीठ देखील घातले आहे.

किती खर्च आला? (Success Story Of Fig Farming In Jalna)

अंजीर लागवडीसाठी त्यांना एकूण 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असून, यातून आपल्याला वर्षानुवर्षे योग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे राहुल खोसे सांगतात. चार पाच वर्षाच्या एका झाडापासून सुमारे 15 किलो अंजीर मिळतात. पूर्णपणे परिपक्व झालेले एक झाड एका वेळी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत नफा कमावून देऊ शकते. उत्पन्नाचे अन्य साधन म्हणून राहुल यांनी आपल्या अंजीर पिकामध्ये मागील दोन वर्षांपासून सोयाबीन पीक देखील घेतले आहे. ज्यामुळे त्यांना डबल उत्पादनांचे साधन उपलब्ध झाले आहे.

किती मिळाले उत्पन्न?

राहुल यांच्या अंजीर पिकातून त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात असून झाली आहे. पहिल्याच वर्षी राहुल यांनी अंजीर विक्रीतून आतापर्यंत एक ते दीड लाख रुपयांचा नफा मिळल्याचे ते सांगतात. याशिवाय त्यांनी सोयाबीन हे आंतरपीक घेतल्याने त्यांना अतिरिक्त फायदा झाल्याचे ते सांगतात. आपल्या अंजीरची ते ग्राहकांना थेट विक्री करत असून, त्यांनी अंबड, कुंभार पिंपळगाव या त्यांच्या आसपासच्या परिसरात जागोजागी अंजीर विक्रीसाठी स्टॉल उभारले आहेत. त्यामुळे त्यांना चांगला दर मिळण्यास फायदा झाला आहे. दरम्यान आपल्याला अंजीर पिकातून एकरी 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा (Success Story) असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर

अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पचन, हृदयविकार, हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी अंजीर खाण्यास प्राधान्य दिले जाते. अंजीर हे फळ त्याच्या पौष्टिक समृद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, पौष्टिक फायबर, पोषक घटक आणि लोह असते. अंजिराचे लोणचे देखील केले जाते. अंजीर हृदयासाठी खूप फायदेशीर असून, ते बीपी नियंत्रित करते. त्यात भरपूर इलेक्ट्रोलाईट्स आणि पोटॅशियम असते. त्यामुळे रक्ताला मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळतात.

error: Content is protected !!