हॅलो कृषी ऑनलाईन: राजस्थानमधील पशुपालक आणि उद्योजक (Success Story) विभोर जैन (Vibhor Jain) आणि त्यांची पत्नी इशिता जैन (Ishita Jain) 100 गिर गायींचे संगोपन (Gir Cow Farming) करून वार्षिक 1.5 कोटी रूपयांची उलाढाल (Success Story) करत आहेत.
शेतीनंतर दुग्ध व्यवसाय (Dairy Business) हा कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम आणि उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो. यामध्येही गायीचे पालन सर्वाधिक लोकप्रिय आहे. गायींच्या संगोपनामुळे फक्त दूध, दही आणि तूप मिळत नाही, तर शेतकर्यांना शेतीसाठी सेंद्रिय खतेही मिळतात, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते. यामुळेच सध्या आपल्या देशातील तरुण दुग्ध व्यवसायातही हात आजमावत आहेत आणि भरपूर नफा कमावत आहेत. या तरुणांपैकी एक म्हणजे किनाया ऑरगॅनिक फार्म्स अँड लाइफ ब्रँडचे (Kinaya Organic Farms & Life Brand) संस्थापक विभोर जैन, यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केल्यानंतर कॉर्पोरेट नोकरीऐवजी डेअरी फार्मिंग व्यवसाय हा पर्याय निवडला. राजस्थानचे प्रगतीशील पशुपालक आणि उद्योजक विभोर जैन आणि त्यांची पत्नी इशिता जैन हे सध्या 100 गीर गायींचे संगोपन करून चांगला नफा कमावतात (Success Story).
दुग्धव्यवसायाची सुरुवात
घरातील कोणीही कृषी क्षेत्राशी संबंधित नसतांना सुद्धा वयाच्या 22 व्या वर्षी विभोर जैन यांनी 2017 मध्ये किनाया ऑरगॅनिक फार्म सुरू केला. त्यांचा डेअरी फार्म तिबरिया, हिंगोनिया रोड, जयपूर, राजस्थान येथे आहे. विभोर जैन यांच्याकडे जमीन नसल्याने भाड्याच्या जमिनीवर त्यांनी व्यवसाय सुरू केला. तीन वर्षांनंतर, त्यांनी जमीन खरेदी केली सध्या त्यांच्याकडे 12 एकर शेती आहे (Success Story).
गीर गायी संगोपनाची सुरुवात
दुग्ध व्यवसायाच्या सुरुवातीला विभोर यांनी 20 गीर जातीच्या गायी आणि एक बैल खरेदी केला होता. 2017 मध्ये जेव्हा मी गीर गायी विकत घेतल्या तेव्हा एका गायीची सरासरी किंमत 1.25 लाख रुपये होती. विकत घेतलेल्या गायींमध्ये काही गाभण तर काही दुभत्या होत्या.
राजस्थानमध्ये हरियाणवी, राठी, थारपारकर, कंकरेच, गिर, नागौरी, साहिवाल, माळवी या देशी गायींच्या अनेक जाती राज्यातील विविध जिल्ह्यांच्या हवामानानुसार पाळल्या जातात. बहुतेक पशुपालक गीर गायी पाळतात असे त्यांना कळले. मग त्यांनी सुद्धा गीर गायी पाळण्याचा निर्णय घेतला (Success Story).
देशी गायींच्या तुलनेत जर्सी गाईंमधून अधिक दूध मिळू शकते, मात्र जर्सी गायी पाळण्याऐवजी देशी गायी पाळल्याने पर्यावरणाशी जोडले गेल्याचा आनंद मिळतो. याला तुम्ही माझा छंदही म्हणू शकता असे विभोर सांगतो (Success Story).
125 रुपये लिटरपर्यंत दुधाला भाव (Success Story)
विभोर जैन म्हणाले की, चांगल्या दरात दुधाची विक्री करण्यासाठी प्रथम ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. यासाठी आम्ही फेसबुक आणि यूट्यूबची मदत घेतली. आम्ही आमच्या शेतीचा संपूर्ण दिनक्रम YouTube वर दाखवायचो. सुरुवातीला मी गिर गाईचे दूध 91 रुपये प्रति लिटर दराने विकायचो. सध्या मी ते 125 रुपये प्रति लिटर दराने विकतो. मात्र, या दराने दुधाची फारशी विक्री होत नाही. एवढे महागडे दूध विकत घेणारे ग्राहक फार कमी आहेत. आमचे डेअरी फार्म दररोज 300 ते 350 लिटर दुधाचे उत्पादन करते. सरासरी 100 ते 125 लिटर दुधाची विक्री करून उरलेल्या दुधापासून तूप तयार करतो. आमचे तेच तूप 3300 रुपये प्रति लिटरने विकले जाते. त्यांचे तूप अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये निर्यात होते. ताक जयपूर येथे स्थानिक पातळीवर विकतात.
दुग्ध व्यवसायातील आव्हाने
विभोर जैन यांनी सांगितले की, दुग्ध व्यवसायाच्या सुरुवातीला तीन प्रकारची आव्हाने आहेत. प्रथम- योग्य जातीच्या गायीची निवड, दुसरे योग्य मजूर शोधणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे, तिसरे म्हणजे योग्य मार्केटिंग. या तीन आव्हानांना तोंड देता आले तर दुग्ध व्यवसायात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.
विभोर जैन सांगतात की ते ज्वारी, रिझका, बाजरी, सुपर नेपियर, मोरिंगा, बरसीम, मेथी यासह कडुनिंबाचा हिरवा चारा असा विविध चारा हंगामानुसार पिकवतो.
दुग्ध व्यवसायातून वार्षिक उलाढाल
युवा उद्योजक विभोर जैन सांगतात की त्यांची वार्षिक उलाढाल दूध, ताक, तूप आणि पौर्णिमा शतधौत तूप मलई इत्यादींसह 1.25 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये त्यांचा खर्च 80 ते 90 लाख रुपये आहे. उरलेला नफा आहे (Success Story).
पौर्णिमा शतधौत घृत क्रीम (Shat Dhaut Ghrit Cream)
इशिता जैन सांगतात की, चरक संहितेत सापडलेल्या प्राचीन सूचनेनुसार, दर महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री ते विशिष्ट पद्धतीने मंत्राच्या जपाने पौर्णिमा शतधौत घृत हे गीर गायीच्या तुपाचे क्रीम तयार करतात. ही क्रीम चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात, डाग दूर होतात, त्वचेचा कोरडेपणा निघून जातो, याशिवाय ही क्रीम त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांवर प्रभावी आहे. या उत्पादनाला ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. एकदा वापरणारा ग्राहक पुन्हा आमच्याकडून ऑर्डर करतो (Success Story).