हॅलो कृषी ऑनलाईन: हरियाणातील एका शेतकऱ्याचा मुलगा परवेझ खान (Success Story) याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या SEC ट्रॅक आणि फील्ड आउटडोअर चॅम्पियनशिप 2024 (SEC Track and Field Outdoor Championships 2024) या धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक (Running Competition Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. हे पदक जिंकणारा परवेझ हा पहिला भारतीय खेळाडू (Success Story) ठरला आहे.
परवेझ खान याचा सुवर्णपदक जिंकण्याचा सुवर्णक्षण– https://youtu.be/nGFeY4T-Hgk
हरियाणातील नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागातील चहलका गावातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा परवेझ खान (Parvez Khan) याने शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अमेरिकेतील (America) फ्लोरिडा (Florida) येथे आयोजित SEC ट्रॅक आणि फील्ड आउटडोअर चॅम्पियनशिप 2024 मध्ये, परवेझने 1500 मीटर आणि 800 मीटर शर्यती स्पर्धेत प्रथम स्थान मिळविले आहे.
यानंतर, रविवारी, परवेझ 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक आणि 800 मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकून हे स्थान मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
शेतकऱ्याचा मुलगा (Success Story)
एसईसी ट्रॅक आणि फील्ड आउटडोअर चॅम्पियनशिप 2024 मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा परवेझ खान हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याचे वडील हरियाणात शेती करतात. परवेझ खान हा भारतीय नौदलात कार्यरत आहेत. वयाच्या 13 व्या वर्षी परवेझने आपले घर सोडले आणि आपली छाप पाडण्यासाठी दिल्लीला आले. याआधीही परवेझ खानने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 2021-22 मध्ये तो राष्ट्रीय चॅम्पियनही ठरला आहे.
महिंद्राने केले कौतुक (Success Story)
महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर परवेझच्या वेगाचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की “परवेझ खानने धावण्याच्या स्पर्धेत पहिला येऊन ऑलिम्पिकचा मार्ग सुकर केला आहे”.
परवेझचे वडील नफीस अहमद म्हणतात की, “1500 मीटर धावपटूंची क्रमवारी 30 जूनपूर्वी जाहीर केली जाईल, त्यानंतर अव्वल 2 खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी मिळेल.”
ऑलिंपिक जिंकण्याचे परवेझचे स्वप्न (Olympic Dream)
परवेझने प्रसारमाध्यमांना सांगितले की, “ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे की तीन मिनिटे 33 सेकंदात पात्रता मिळवणे सोपे नाही आणि ते खूप कठीण आहे. मी दररोज खूप मेहनत घेत आहे.”