Success Story : मशरूम शेती सुरु केली तेव्हा लोकं नको ते म्हणाले; आज हि महिला देतेय गावातील अनेकांना रोजगार, किती रुपये कमावते?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । जेव्हा कोणी एखादा नवीन व्यवसाय (Success Story) सुरु करते तेव्हा त्याच्या आसपासचे लोक त्याला वेड्यात काढतात. अनेकजण पाय मागे ओढणारेही असतात. व्यवसाय म्हटलं कि त्याचा अभ्यास करून धाडस करणे हे क्रमप्राप्तच आहे. परंतु यावेळी आपल्याला टोमणे मारणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपले काम अधिक प्रभावीपणे करणे गरजचे आहे. आज आम्ही तुम्हाला प्रियांका नावाच्या एका महिला शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहोत. प्रियांका यांनी मशरूमची लागवड (Mushroom Farming) करून गावातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

प्रियंकाने मशरूम लागवड सुरु केली तेव्हा अनेकांनी तिला टोमणे मारायला सुरवात केली होती. मशरूम कोण खाणार असे लोक प्रियंकाला म्हणू लागले. यावर प्रियंकाने काही दिवस मोफत मशरूम वाटून लोकांना मशरूमची आवड निर्माण केली. यानंतर मात्र मशरूम घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत गेली आणि प्रियांकाचा मशरूम व्यवसाय तेजीत चालू लागला. आज प्रियंकाकडे गावातील जवळपास २५ तरुण कमलाआहेत.

हे तंत्रज्ञान वापरून हायटेक शेतीतून शेतीमधील उत्पन्न करा दुप्पट

शेतकरी मित्रांनो आता शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप वापरून १ लाख शेतकरी सध्या हायटेक शेती करून अधिक नफा कमवत आहेत. तुम्हीही या शेती उपयोगी मोबाईल अँप च्या मदतीने प्रगतशील शेतकरी बनून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोन देऊन मोठा नफा कमावू शकता. आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला रोज कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळतो. तसेच तुमच्या जवळील सर्व खात दुकानदारांशी तुम्ही या अँपच्या मदतीने संपर्क करून खाते Online मागवू शकता. शिवाय तुमचा शेतमाल अँपवर विक्रीसाठी पोस्ट करून थेट बांधावर शेतमालाची विक्री करू शकता. यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज इथे दिला जातो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घ्या.

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील कांते गावात राहणाऱ्या प्रियंका पांडे यांनी आपल्या शेतात पारंपरिक पिके न घेता मशरूम लागवड केली आहे. सर्वात अगोदर प्रियांका यांनी मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेतले. कृषी विज्ञान केंद्र गायना पिथौरागढ येथून मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षणही घेतल्यानंतर प्रियंकाने मोठ्या प्रमाणावर मशरूमची लागवड केली. तसेच प्रियांका महिन्याला २ लाख रुपये इतकी कमाई करत आहे. आता तिने गावातील इतर शेतकऱ्यांना मशरूम लागवडीसाठी प्रोत्साहन दिले असून त्यांचे मशरूम ती जवळच्या शहरांतील मोठ्या हॉटेलमध्ये पुरवते आहे.

मशरूम लागवडीसाठी आवश्यक अटीः

  • स्पॉन-रनसाठी 22-25˚C तपमान आणि पीक उत्पादनासाठी 14 ते 18 डिग्री सेल्सियस तापमान श्रेणी.
  • 85-90% आर्द्रता पातळी. आर्द्रतेसह संतृप्त वातावरण त्याच्या वाढीसाठी योग्य आहे.
  • कंपोस्टवर पाणी थेट टाकू नये.
  • स्पॅन-रनसाठी वापरल्या जाणार्‍या खोल्यांमध्ये योग्य वायुवीजन असणे आवश्यक आहे.
  • खोलीतील सीओ 2 पातळी 0.15% च्या खाली असणे आवश्यक आहे आणि प्रति चौरस फूट 10 क्यूबिक फूट ताजी हवा प्रदान करून किंवा तासाला 4 ते 6 हवाई शुल्क प्रदान करून याची देखभाल केली जाते.
  • खोल्यांमध्ये तापमानात अचानक चढ-उतार होऊ नये.

मशरूम फार्मिंग प्रोजेक्टसाठी सबसिडीज आणि लोन:

  • प्रशिक्षित मशरूम लागवड करणार्‍यांना लागवडीच्या प्रक्रियेचा प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर कर्ज दिले जाते ज्यास राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड / एनएचबी) ने मान्यता द्यावी. त्यानंतर आवश्यक असलेल्या कर्जाच्या रकमेवर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना या प्रकरणांची शिफारस केली जाते.
  • राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ देखील मशरूमच्या शेतकर्‍यांना पतपुरवठा केलेल्या बॅक-एंड सबसिडीच्या स्वरूपात मदत पुरवतो. अनुदानाची रक्कम एकूण प्रकल्प खर्चाच्या 20% आहे (सामान्य भागात जास्तीत जास्त 25 लाख आणि डोंगराळ भागात 30 लाख).
  • बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकार मशरूम उत्पादकांना अनुदान देखील देते. कंपोस्टवर अनुदान जास्तीत जास्त ट्रेसाठी २०- @० रुपये / ट्रे दिले जाते. कंपोस्ट वाहतुकीसाठी 100% अनुदान दिले जाते.
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना 20 फूट x 12 फूट x 10 फूट परिमाण, इतर साधने इत्यादी मशरूमच्या घरासाठी 80,000 रुपयांची मदत प्रदान करते.
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेंतर्गत कृषी व सहकार विभागामार्फत मशरूम शेतकर्‍यांना मदत दिली जाते. मुख्य तथ्येः
  • स्पॅन युनिट्ससाठी कंपोस्ट तयारी व प्रशिक्षण – सार्वजनिक क्षेत्रासाठी 100% मदत आणि खासगी क्षेत्रासाठी एकूण खर्चाच्या 50% अनुदानाच्या स्वरूपात (जास्तीत जास्त अनुदान 50 लाख रुपये).
  • स्पॉन उत्पादन युनिट – सार्वजनिक क्षेत्रासाठी एकूण खर्चाच्या 100% आणि खासगी क्षेत्रासाठी 50% (जास्तीत जास्त अनुदान 15 लाख रुपये).
  • कंपोस्ट उत्पादन युनिट – सार्वजनिक क्षेत्रातील खर्चाच्या 100% आणि खाजगी क्षेत्राला 50% खर्च (जास्तीत जास्त अनुदान 20 लाख रुपये).
error: Content is protected !!