IIT इंजिनिअरने अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सुरू केला डेअरी व्यवसाय; आता कमावतो आहे कोट्यावधी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । असे क्वचितच घडते जेव्हा विलासमय जीवन सोडून एखादी व्यक्ती उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी साधे जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेते. किशोर इनदुकुरी हे व्यवसायाने अभियंता असून त्यांनी फक्त भारतात परत जाण्यासाठी आणि 20 गायी विकत घेण्यासाठी अमेरिकेतील चांगल्या पगाराची आणि फायद्याची नोकरी सोडली. आणि आज त्यांचे डेअरी फार्म 44 कोटी रुपयांच्या कंपनीत वाढले आहे. आयआयटी खडगपूर येथील पदवीधर इनदुकुरी मूळचे कर्नाटकातील असून पुढील अभ्यासानंतर ते अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स विद्यापीठात गेले. अभ्यास संपल्यानंतर इनदुकुरी यांनी इंटेल या अमेरिकन टेक कंपनीबरोबर काम करण्यास सुरवात केली. परंतु ते मनापासून समाधानी नव्हते आणि त्यांना त्यांच्या देशात परत यायचे होते. इंटेलबरोबर सहा वर्षे काम केल्यावर शेवटी अमेरिकेत नोकरीला निरोप देऊन ते परत भारतात आले.

भारतात परत आल्यावर त्यांना लवकरच कळले की शुद्ध आणि सुरक्षित दुधासाठी मर्यादित पर्याय आहेत. अशा प्रकारे त्याच्या दुग्धशाळेची सुरुवात 2012 मध्ये केवळ 20 गायींच्या गुंतवणूकीने झाली. ते स्वत: गायींचे दूध काढून आणि थेट ग्राहकांकडे पोचवायला लागले. दुध जास्त काळ टिकेल यासाठी त्यांनी कुटुंबासमवेत फ्रीझ आणि स्टोअर सिस्टमची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 2018 पर्यंत इनदुकुरी यांचे डेअरी फार्म हैदराबादच्या आसपासच्या सहा हजार ग्राहकांना दुधाचा पुरवठा करते. त्यांनी आपला मुलगा सिद्धार्थ याच्या नावावरून फार्मच नाव सिद ठेवले. आज डेअरी फार्मने आपले कार्य वाढवत 120 कर्मचार्‍यांना सामील केले असून वार्षिक उत्पन्न 40 कोटी आहे. फार्ममधून दररोज 10 हजार ग्राहकांना दूध पुरवठा केला जातो.

इनदुकुरीन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की सुरुवातीला दुग्ध उद्योगात कठोर परिश्रम व संघर्ष करावा लागला. त्यांनी आपली संपूर्ण बचत वापरली आणि दुग्धशाळेच्या उभारणीसाठी कुटुंबाची मदत घेतली. 1 कोटी आणि नंतर 2 कोटींच्या सुरुवातीच्या गुंतवणूकीने त्यांनी डेअरी उद्योगाला पाय रोवले. 2018 मध्ये दुग्धशाळेचे कामकाज वाढविण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी बँकेकडून 1.3 कोटी कर्ज घेण्यात इनदुकुरी यशस्वी ठरले. गाई आणि म्हशीच्या दुधापासून त्यांच्या फार्ममध्ये तूप, दही, सेंद्रिय चीज, गाईचे दुध आणि म्हशीचे दूध अशा अनेक उत्पादनांमध्ये विस्तार आला आहे. फार्मच्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. कोरोना कालावधीत दुधाच्या व्यवसायाला थोडा त्रास झाला असला तरी, त्यांनी दुधाचे उत्पादन थांबवले नाही. पुढे त्यांचे लक्ष्य हैदराबादच्या बाहेर जाणे आणि बंगळुरूसारख्या जवळच्या शहरांमध्ये सेवा वाढविणे हे आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!