Success Story : तीन शेतकऱ्यांची एकी; पालक लागवडीतून हेक्टरी 15 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक शेतकरी भाजीपाला पिकांच्या लागवडीवर (Success Story) भर देताना दिसत आहे. पारंपरिक पिकांपेक्षा कमी कालावधीत आणि कमी उत्पादन खर्चात भाजीपाला लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना त्यातून चांगला नफा देखील मिळतो. भाजीपाल्यामध्ये शेतकरी फळभाज्यांची लागवड करतात. मात्र पालेभाज्यांना आहारात विशेष मागणी व महत्व असल्याने त्यांना नेहमी बाजारात मागणी असते. हीच बाब लक्षात घेऊन उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील तीन शेतकऱ्यांनी एकत्र येत, अगदी कमी कालावधीत एक हेक्टर पालक भाजीच्या लागवडीतून 15 लाखांची कमाई (Success Story) केली आहे.

खर्च आणि उत्पन्न किती? (Success Story Of Spinach Farming)

वाराणसी जिल्ह्यातील प्रताप नारायण मौर्य (अलाउद्दीनपूर), अखिलेश सिंग (मिर्झापूर) आणि सुभाष के पाल (कुट्टुपूर) या तीन शेतकऱ्यांनी (Success Story) आहारातील पालक भाजीचे महत्व आणि मागणी लक्षात घेऊन, विचाराअंती पालक भाजीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या एकीच्या जोरावर हा प्रयत्न यशस्वी देखील करुन दाखवला आहे. पालक शेतीसाठी मशागत आणि इतर खर्च मिळून त्यांना हेक्टरी 1,40,000 ते 1,50,000 इतका खर्च आला. त्यातून त्यांना हेक्टरी 90 ते 100 टन उत्पादन मिळाले आहे. बाजारात त्यांच्या पालकाला 15 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळाल्याने, एका हेक्टरमधून 15 लाखांची कमाई या तीन शेतकऱ्यांनी केली आहे.

कशी केली लागवड?

शेतकरी प्रामुख्याने पालक लागवड ही टोकन पद्धतीने करतात. याशिवाय काही शेतकरी पालकाची लागवड ही एका सरळ ओळींमध्ये करतात. तर काही शेतकरी हे पालकाचे बी फोकून, त्यानंतर ते बियाणे जमिनीत मिसळून करतात. पालक भाजीची लागवड करताना पालकाच्या प्रत्येक झाडाला एक विशिष्ट जागा लागते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी दोन झाडांना आता पुरेशी जागा मिळेल अशा पद्धतीने पालकची लागवड केली. इतकेच नाही तर त्यांनी पालकची लागवड ही लागोपाठ 15 दिवस केली. टप्प्याटप्प्याने लागवड केल्याने त्यांना काढणीला देखील सोपे झाल्याचे ते सांगतात. मार्च-एप्रिल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या हंगामामध्ये पालक भाजीची विशेष काळजी घेणे गरजचे असते. अधिकचे ऊन आणि अधिकची थंडीचा भाजीवर परिणाम होतो.

पालक भाजीची वैशिष्ट्ये

पालक ही एक फक्त चविष्ट भाजी नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर आहे. या भाजीला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे समृद्ध स्त्रोत मानले जाते. ही भाजी शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. पालक मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. पालकाच्या भाजीमध्ये भरपूर फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे शारीरिक ऊर्जा मिळते आणि त्यामुळे थकवा कमी होतो. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

error: Content is protected !!