success story : शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो आणि त्याचे आर्थिक उत्पन्न देखील वाढते. सध्या टोमॅटोमधून शेतकऱ्यांनी लाखो करोडो रुपये कमावल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. यामध्येच आता मिरचीचे दर देखील वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच ढासळले आहे. गृहीणींचे बजेट जरी ढासळले असले तरी याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
अनेक शेतकरी मिरचीतुन लखो रुपये कमावत आहेत. सध्या देखील जालना जिल्ह्यातील खादगाव येथील शेतकऱ्याने अवघ्या 30 गुंठे मिरचीतून त्यांना 2 लाख रुपयांचे उत्पादने घेतले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची आता सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. सुनील साबळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सुनील यांनी मिरची उत्पादनातून चांगला आर्थिक फायदा मिळवला आहे. Sucess Story
माहितीनुसार, सुनील साबळे आणि त्यांचे दोन भाऊ पूर्णवेळ शेती पाहतात. शहराजवळ गाव असल्याने भाजीपाला पिके घेण्याकडे त्यांचा कल असतो. कारण की त्या शेतमालाची विक्री करण्यास शहराजवळ परवडते. म्हणून हे जास्तीत जास्त भाजीपाला पिकवतात. (sucess story)
यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सुनील यांनी यासाठी लागणारे रोप त्यांनी घरीच तयार केले. त्याचबरोबर लागवड केल्यानंतर योग्य मशागत केली. खतांचे देखील योग्य नियोजन केले त्याचबरोबर यासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. यासाठी त्यांना एकूण 50 हजार रुपये खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मिरची निघण्यास सुरुवात झाली असून त्यांनी आतापर्यंत एकूण 2 लाख रुपये कमावले आहेत. जर मिरचीचे दर असेच कायम राहिले तर अजून एक ते दीड लाख रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.