Success Story : सेंद्रीय गुळनिर्मिती व्यवसाय; करतोय वर्षाला लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नवयुवकांचा शेतीकडे ओढा वाढला असून, ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग (Success Story) करताना दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये ऊस आधारित प्रक्रिया उद्योगांना बराच वाव आहे. हीच बाब लक्षात घेऊन ऊस शेतीवर आधारित सेंद्रीय गुळाचा प्रयोग यशस्वी करण्यात उत्तर प्रदेशातील बागपत येथील एका तरुण शेतकऱ्याला यश आले आहे. हा तरुण शेतकरी सध्या सेंद्रिय पद्धतीने गूळ निर्मिती करत वार्षिक 8 ते 9 लाख रुपये (Success Story) कमावत आहे.

सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड (Success Story Of Organic Jaggery Business)

युपीच्या बागपत जिल्ह्यातील सुनहेडा गावच्या विजय या तरुण शेतकऱ्याची चर्चा सध्या सर्वदूर होत आहे. विजय सध्या सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती करत असून, ते आपल्या उसाला कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर करत नाही. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसाला बाजारात विक्री करण्याऐवजी ते स्वतः त्यावर प्रकिया करून सेंद्रिय पद्धतीने गूळ निर्मिती करत आहे. हा सेंद्रिय पद्धतीने निर्मिती केलेला गूळ शुद्धतेच्या बाबतीत विचार करता दिसताच सामान्य गुळापेक्षा थोडा काळसर दिसतो. त्यामुळे त्याची तात्काळ ओळख होते. गूळ प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आठ लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

तीन प्रकारच्या गुळाची निर्मिती

विजय सध्या तीन प्रकारच्या गुळाच्या निर्मिती करत आहेत. यामध्ये औषधी गूळ, ड्राय फ्रुटस गूळ आणि सर्वसाधारण गूळ अशा तीन प्रकारे ते गूळ निर्मिती करत आहेत. औषधी गूळ तयार करताना ते त्यात अंबाडीच्या बिया आणि खरबूजाच्या बिया टाकतात. ज्यामुळे हा गूळ आरोग्यदायी ठरत, आयुर्वेदिक पातळीवर ग्राहकांच्या पसंतीस पडतो. ड्राय फ्रुटस प्रकारचा गूळ तयार करताना ते त्यात बदाम, खजूर आणि शेंगदाणे टाकून तयार करतात. या गुळाला बाजारात १८० ते २५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. तर तिसरा प्रकारचा गूळ ते सर्वधारण पद्धतीने तयार करतात.

किती होते कमाई

शेतकरी विजय यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या सेंद्रिय पद्धतीने निर्मिती (Success Story) केलेल्या गुळाच्या माध्यमातून वार्षिक 8 ते 9 लाखांची कमाई होते. ते आपला गूळ प्रामुख्याने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, कोलकाता आणि राजस्थान येथे विक्रीसाठी पाठवतात. आपल्या गूळ उद्योगाची अद्याप प्राथमिक सुरुवात असून, येत्या काळात या उद्योगाला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचे आहे, असे शेतकरी विजय सांगतात. यासाठी त्यांनी अलीकडेच पंतप्रधान शेतकरी उत्पादक कंपनी योजनेअंतर्गत नोंदणी केली असून, उद्योगाला पुढे नेण्याच्या योजनेवर त्यांचे काम सुरु आहे.

कशी होते गूळनिर्मिती?

सेंद्रिय पद्धतीने गूळ निर्मिती (Success Story) करण्याची सुरुवात सर्वप्रथम उसाच्या गाळपापासून सुरु होते. त्यानंतर तयार झालेल्या उसाच्या रसाला गरम कढाईत टाकले जाते. रसाला स्वच्छ करण्यासाठी तसेच गूळ काळा पडू नये. यासाठी उकळत्या रसामध्ये जंगली भेंडी टाकली जाते. अशा प्रकारे तीन कढाईमधून जात गुळाला स्थायूरुप अवस्था प्राप्त होईपर्यंत शिजवले जाते. तिसऱ्या कढाईमध्ये गूळ पूर्णतः शिजल्यानंतर त्याला गुळाचे स्वरूप प्राप्त होते. यासाठी त्यांच्याकडे कुशल कारागीर असून, ते गूळ शिवजल्यानंतर त्याला भेलीच्या साच्याच्या आकारात टाकतात. याशिवाय ते मागणीनुसार काजू, मनुका, काळी मिरची टाकून आपल्या हिशोबाने छोटे-छोटे तुकडे देखील करतात. काजू, मनुका वापरून तयार केलेल्या गुळाला अधिक मागणी असल्याचे ते सांगतात.

आयोग्यास लाभदायी

गुळ हा आरोग्यास लाभदायी मानला जातो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण झाल्याने त्याला बाजारात विशेष मागणी असते. सेंद्रिय पद्धतीने निर्मिती केलेला गूळ हा रसायनमुक्त असतो. त्यामुळे शहरी नागरिकांकडून त्याला विशेष पसंती दिली जाते.

error: Content is protected !!