हॅलो कृषी ऑनलाईन: गरज ही शोधाची जननी आहे (Success Story) असे आपण ऐकले आहे परंतु राजस्थानमधील 18 वर्षांचा तरुण (Rajasthan Young Boy) रामधन लोढा (Ramdhan Lodha) याने ते सिद्ध करून दाखविले आहे. रामधन याने शेतीसाठी उपयुक्त आणि बहुउद्देशीय सौर ऊर्जेवर चालणारे तणनाशक यंत्र (Solar-Powered Weed Killer Machine) तयार केले आहे. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेल्या त्याच्या या यंत्रामुळे मजुरीवरील खर्च 50% कमी तर होईलच शिवाय कार्यक्षमता 60 टक्क्यांनी वाढेल. रामधन याने तयार केलेले हे यंत्र कृषी क्षेत्रातील नवोपक्रमाच्या लाटेला प्रेरणा देणारी आहे (Success Story).
राजस्थानच्या झालावाड येथील रामधन याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी शेतीतील संघर्ष जवळून पाहिला होता. आपल्या पालकांना आणि इतर शेतकऱ्यांना थोड्या मोबदल्यासाठी शेतात काम करताना पाहून, रामधनला त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी समजल्या. राजस्थानमधील एका शेतकरी कुटुंबात संगोपन झालेल्या रामधनने वडिलांना आणि गावातील इतर शेतकऱ्यांना शेतातील अनावश्यक आणि पिकांना हानिकारक अशा तणांशी लढताना पाहिले. या तणांमुळे पिकाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी होते हे त्याने स्वतः अनुभवले. या सुरुवातीच्या अनुभवांनी त्याच्यामध्ये विज्ञान आणि नवकल्पनाचे बीज पेरले गेले. यातून लहान-शेतकऱ्यांचे ओझे हलके करण्याच्या उद्देशाने त्याने प्रयत्न करण्यास सुरुवात केली (Success Story).
विज्ञानाची आवड
लहानपणीही रामधनला विज्ञानाबद्दल स्वाभाविक कुतूहल होते. काहीतरी नवीन आणि फायदेशीर बनवण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन मशिनशी छेडछाड करण्यात आणि प्रयोग करण्यात तासनतास घालवले. काहीतरी नवीन घडवण्याच्या मानसिकतेतून शाळेत होणाऱ्या प्रत्येक विज्ञान स्पर्धेत त्याने भाग घेण्यास सुरुवात केली (Success Story). त्याचे सुरुवातीचे प्रयत्न लहान स्वरूपाचे असले तरी, ते एका मोठ्या ध्येयाकडे पाऊल टाकत होते. त्यांचे वडील राजाराम लोढा यांना पिकांना खत घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड फवारणी पंपाशी झगडताना पाहून त्याला हे मिशन अधिकच निकडीचे बनले. त्याच्या वडिलांना सहन करावे लागणारे कष्ट, सततच्या वापरामुळे खांद्याला होणारी दुखापत आणि रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे सततचे येणारे आजारपण हे सर्व रामधन बघत होता.
अडचणीवर मात करून केला नाविन्याच्या शोध
वडिलांना होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्याचा निर्धार करून, रामधन याने एक यंत्र तयार केले जे केवळ खतांची फवारणी करू शकत नाही तर तण देखील उपटून टाकू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील शारीरिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो (Success Story).
मात्र, निधी उपलब्ध करून घेण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर होते. आपल्या आई-वडिलांवर आर्थिक भार पडू नये म्हणून तो त्याच्या प्रकल्पासाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठी विज्ञान स्पर्धांकडे वळला. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्याने स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या चिकाटीचे फळ त्याला मिळाले आणि आज त्यांनी सौरऊर्जेवर चालणारे (Solar Powered), संकरित तणनाशक यंत्र यशस्वीरित्या विकसित केले आहे (Success Story).
हे बहुउद्देशीय कृषी साधन केवळ पर्यावरणपूरकच नाही तर शेतकऱ्यांना लागणारे शारीरिक श्रमही लक्षणीयरीत्या कमी करते. हे यंत्र पारंपारिक शेती पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढवण्यासाठी डिझाइन केले आहे.
ओळख आणि बक्षिसे
रामधनचे समर्पण आणि सर्जनशीलता दुर्लक्षित राहिलेली नाही. अलीकडेच, त्याने स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या इंडियन सिलिकॉन व्हॅली चॅलेंज (Indian Silicon Valley Challenge) या राष्ट्रीय स्पर्धेत बक्षीस रक्कम म्हणून 1 लाख रुपये जिंकले (Success Story). या पुरस्काराने त्यांच्यासाठी नवीन संधी खुल्या केल्या आहेत, त्याच्या या शोधामुळे त्याला भारताच्या बाहेरही ओळख मिळाली आहे. बाहेरच्या देशातून त्याला विचारणा होते असे तो अभिमानाने सांगतो.