Success Story : सध्या आपल्याकडे बऱ्याच तरुणांच्या नोकरी घरी बसून आहेत. आयआयटी मधील बऱ्याच तरुणांच्या नोकरी तर घरी बसून आहेत. यामधून तरुणांना थोडाफार वेळ मिळतो मात्र काही तरुण यावेळीचा चांगला फायदा करून घेतात तर काही असाच फिरण्यावारी घालवतात. मात्र सध्या एका नांदेड मधील तरुणाने या वेळेचा चांगला उपयोग करून घेतला आहे. आयआयटी मधून उच्च शिक्षण घेतलेल्या युवकाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून या खत निर्मिती मधून हा युवक महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.
नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील रहिवासी तरुण जवळच पिंपळाभत्या येथे हा प्रकल्प सुरू केला आहे. प्रज्ञानंद पोहरे असे या तरुणाचे नाव असून तो सध्या बेंगळूर या ठिकाणच्या एका कंपनीमध्ये कार्यरत आहे. मात्र त्याचे नोकरीचे स्वरूप ऑनलाईन असल्याने मिळालेल्या मोकळ्या वेळात त्याने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.
इतर राज्यातून मागवले गांडूळ
आपल्या मोकळ्या वेळेचा उपयोग करण्यासाठी या तरुणाने गांडूळ खत प्रकल्पाचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हरियाणा राज्यातून ऑस्ट्रेलिया प्रजातीचे गांडूळ मागवले आहेत. या गांडूळाच्या माध्यमातून खत निर्मिती तसेच वर्मीवॉश फवारणी औषध तयार करण्यात येते. त्याच्याकडील खताला मोठी मागणी असून या खतासोबतच पिकांवरील कीटकनाशकाचा नायनाट करण्यासाठी वर्मी या फवारणी औषधाची देखील या ठिकाणी विक्री केली जात आहे. त्यामुळे या तरुणाला चांगला फायदा होत असून तो महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.
गांडूळ खताचे नेमके फायदे काय?
- जमिनीची उत्पादन क्षमता वाढते
- त्याचबरोबर जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढते आणि जमीन भुसभुशीत होऊन उगाव बनते
- झाडांची निरोगी वाढ होते कीटकनाशकाच्या खर्चात बचत होते
- त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते
- फळबागांमध्ये टिकाऊपणा आणि चव येते
- जमिनीचे बाष्पीभवन होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
वर्मी वॉश म्हणजे काय?
गांडूळाच्या शरीरामधून जे पाणी निघते त्याला वर्मी वॉश असे म्हणतात. या पाण्यामुळे पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव दूर होऊन पिकांवरील कीटकांच्या नाश होतो. एक लिटर वर्मी वॉश मध्ये आठ लिटर पाणी टाकून शेतीवर सकाळी आणि संध्याकाळी फवारणी केल्यास रोगराई दूर होते. त्याचबरोबर वर्मी वॉश मध्ये झाडांना जमिनीला लागणारे न्यूट्रियन्स म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश इत्यादी घटक असतात. त्यामुळे याचा शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होतो