Success Story : 20 एकर शेती, 13000 झाडे; 20 वर्षांमध्ये कोट्यवधींचा मालक बनला शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक पद्धतीने शेती करताना शाश्वती नसते. त्यामुळे सध्या देशातील अनेक शेतकरी (Success Story) शेतीमध्ये नवनवीन पद्धतीने अर्थार्जन करताना दिसत आहे. सागवान शेती ही देखील त्यापैकीच असून, आता मध्यप्रदेशातील अनिल बड़कुल या शेतकऱ्याला सागवान शेतीमधून 20 वर्षांमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या शेतकऱ्याच्या संयम आणि जिद्दीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज आपण अनिल यांच्या सागवान लागवडीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

मध्यप्रदेशातील टिकमगड जिल्ह्यातील रहिवासी असलेले शेतकरी अनिल बडकुल (Success Story) यांनी आपल्या 20 एकर शेतीमध्ये सागवान लागवड केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून अनिल शेती करत आहेत. मात्र 10 वर्ष पारंपरिक शेती करताना नफा कमी आणि उत्पादन खर्चच जास्त होत होता. यामुळे अनिल यांच्या मनात शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा विचार आला. यासाठी त्यांनी विविध मार्गाने माहिती मिळवण्यास सुरुवात केली.मध्यप्रदेशातील टिकमगड जिल्हा प्रामुख्याने बुंदेलखंडचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील हवामान सागवान शेतीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे त्यांनी सागवान शेती करण्याचे ठरवले.

13000 झाडांची लागवड (Success Story Of Teak Wood Farming)

अखेर 2003 मध्ये ठरवल्याप्रमाणे सागवानाची लागवड करण्यास सुरुवात केली. वर्ष 2003 ते 2013 या 10 वर्षांच्या काळात त्यांनी आपल्या 20 एकर शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने जवळपास 13 हजार सागवानाची झाडे लावली असून, आज या सर्व झाडांची किंमत बाजारभावाप्रमाणे 100 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून पाहिलेले आपले स्वप्न पूर्ण झाल्याने मनाला एक आत्मिक समाधान मिळत असल्याचे शेतकरी अनिल बडकुल सांगतात.

3 वर्ष काळजी घेण्याची गरज

सागवानाची रोपे लावल्यानंतर त्यांना पाणी देणे आणि त्याची काळजी घेणे याच दोन गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे सागवान शेतीसाठी फारसा खर्च येत नाही. सागवानाची लागवड केल्यानंतर झाडे केवळ 3 वर्षांची होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर विशेष काळजी घेण्याची गरज नाही. याशिवाय 3 वर्षानंतर शेताला कुंपण घालण्याचा खर्च वगळता अन्य कोणताही खर्च सागवान शेतीसाठी येत नाही. अनिल यांनी आता आपल्या काही जमिनीवर चंदनाच्या झाडांची लागवड सुरू केली आहे. शेतकऱ्यांना प्रगती साधायची असेल तर त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी वृक्ष शेती करावी, असे आवाहन शेतकरी अनिल बडकुल हे शेतकऱ्यांना करत आहेत.

error: Content is protected !!