Success Story : पावसाळ्यात झेंडू फुलातून शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई; कस केलं नियोजन?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सध्या शेतकरी फळ शेती आणि फुल शेती करून लाखो रुपये कमवत असल्याचे दिसत आहेत. सध्या देखील एका शेतकऱ्याने झेंडूच्या शेतीतून चांगले पैसे कमावले असल्याची माहिती समोर आली आहे. झेंडूची फुले ही दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये जास्त वापरली जातात त्यामुळे अनेकजण त्याची लागवड करताना ते दसरा दिवाळीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील अशीच लागवड करत असतात. मात्र श्रावणामध्ये देखील झेंडूला मोठ्या प्रमाणात मागणी असते याच गोष्टीचा विचार करून श्रावणात झेंडू विक्रीसाठी येईल असं नियोजन करून शेतकऱ्यांने झेंडूची लागवड केली आहे.

नांदेडच्या मुदखेड मधील एका शेतकऱ्याने श्रावण महिन्यातील पूजा पाठ लक्षात घेऊन झेंडूची लागवड केली. या शेतकऱ्याचा प्रयोग देखील यशस्वी झाला असून या शेतकऱ्यांने झेंडू मधून लाखो रुपये कमवले आहेत. विजय इंगोले असा या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने फक्त १३ गुंठे जमिनीमध्ये झेंडूची लागवड केली आणि त्यातून चांगला बक्कळ नफा देखील कमावला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची आता सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. .

लागवडीसाठी १३ हजार रुपये खर्च

कोणतेही पिक लावायचे म्हटले तरी त्याला लागवडीसाठी खर्च हा येतोच. त्यामुळे त्यामधून जर चांगला नफा मिळाला तर शेतकऱ्यांना समाधान मिळते. या शेतकऱ्याला देखील झेंडू लागवडीसाठी 13 हजार रुपये खर्च झाला असून त्यांनी लाखोंचा नफा कमवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नांदेडच्या फुल मार्केटमध्ये ही झेंडूची फुले विक्री साठी जातात.

झेंडूच्या फुलाला किती बाजार भाव मिळतो?

शेतकरी मित्रांनो झेंडूच्या फुलाला किती बाजार मिळतो याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही रोजचा झेंडूचा भाव पाहू शकता त्याचबरोबर बाकी शेतमालाला देखील किती बाजार भाव मिळतोय याची माहिती तुम्हाला अगदी झटपट आणि मोफत मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

पावसाळ्यामध्ये झेंडू येत नाही मात्र यावेळी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचे झेंडूचे पीक चांगले जोमात आले. झेंडूचे पीक जोमात आल्यामुळे शेतकऱ्याला देखील याचा चांगला फायदा झाला आहे. शेतकऱ्यांने फक्त 13 गुंठे शेतीतून चांगला नफा कमवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परिश्रमासोबतच मार्केटचा अभ्यास करून शेतीत प्रयोग केले तर आपण यशस्वी होऊ शकतो हे या शेतकऱ्याने दाखवून दिलंय.

error: Content is protected !!