Success Story : ऊस पिकाला फाटा देत टरबूज लागवड; 2 महिन्यात 55 गुंठ्यातून 5 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तरुणांचा शेतीकडे ओढा वाढला (Success Story) आहे. विशेष म्हणजे हे तरुण शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन बदल करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत, कमी जमिनीत, कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी ऊस पिकाला फाटा देत टरबूज लागवडीतून अल्पावधीत लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी पाण्यात हे टरबूज पीक (Success Story) घेणे शक्य झाले आहे.

कष्टातून साधले यश (Success Story Of Watermelon Farming)

किरण अशोक जाधव असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील आसद येथील रहिवासी आहेत. शेतकरी किरण जाधव यांनी कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य (Success Story) करून दाखवली आहे. त्यांनी आपल्या ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत कलिंगड पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे. ज्यामुळे सध्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या यशस्वी टरबूज लागवडीबद्दल मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

किती मिळाला नफा?

शेतकरी किरण जाधव सांगतात, आपण गेल्या काही काळापासून त्याच पारंपरिक ऊस पिकाच्या लागवडीला कंटाळलो होतो. ज्यामुळे आपण काहीतरी नवीन पीक घेण्याचा विचार करत होतो. अशातच यंदा पाण्याची देखील समस्या असल्याने पारंपरिक ऊस पिकाला बगल देत यंदा कलिंगड लागवड केली. विशेष म्हणजे साठ दिवसांमध्ये टरबूज पिकातून विक्रमी तब्बल ४४ टन उत्पादन मिळाले. यातून आपल्याला खर्च वजा जाता तीन लाख ४७ हजार रुपये नफा झाला आहे. असे ते सांगतात.

टरबूज ऊस पिकाला भारी

शेतकरी किरण जाधव सांगतात, पारंपरिक ऊस पिकात फायदेशीर उत्पन्न मिळत नसल्यामुळे, ५५ गुंठे जमीन क्षेत्रात योग्य प्रकारे नांगरट, मेहनत करून लागवडीची भेसळ मात्रा देऊन ठिबक व मल्चिंग पेपर अंथरूण ४ मार्चला दीड फूट अंतरावर कलिंगड रोपांची लागवड केली. दीड ते दोन एकर ऊस आडसाली करूनसुद्धा एवढे उत्पन्न मिळत नाही. तेवढे उत्पन्न ६० दिवसांमध्ये कलिंगड पिकामध्ये मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!