Success Story : महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन अनेक क्षेत्रात काम करत आहेत. शिक्षण, तंत्रज्ञान, शेती इत्यादी क्षेत्रामध्ये महिला चांगलं काम करत आहेत. अनेक महिला शेती करून चांगले उत्पन्न देखील कमवत आहेत. दरम्यान, बिहारमधील महिला आता पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा शेती. आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण भाजीपाल्याच्या शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या महिलेबद्दल बोलणार आहोत. बिहारमधील एका महिलेने सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करत चांगले उत्पादन घेतले आहे.
संगीता कुमारी असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. ती पाटणा जिल्ह्यातील आठमलगोला ब्लॉकमधील फुलेरपूर गावची रहिवासी आहे. सध्या संगीता कुमारी शून्य मशागतीच्या मदतीने मशरूम आणि बटाटे आणि इतर हिरव्या भाज्यांची लागवड करत आहेत. याशिवाय ती इतर महिलांनाही शेतीचे प्रशिक्षण देत आहे. संगीता कुमारी सांगतात की, पूर्वी घरखर्च भागवण्यासाठी पैशांची कमतरता होती. त्यावेळी त्यांच्याकडे एक हजार रुपयेही नव्हते. मात्र जेव्हापासून त्यांनी भाजीपाला शेती सुरू केली तेव्हापासून त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली. आज संगीता शेतीतून वर्षाला दोन लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
मशरूमची लागवड केली सुरु
संगीता कुमारी एका बिघामध्ये मशरूम, बटाटे आणि इतर पिके घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2015 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. यानंतर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली. अशा परिस्थितीत त्यांच्या पतीने 1500 रुपये दरमहा पगारावर शाळेत नोकरी सुरू केली. पण इतक्या कमी पैशात घरखर्च भागवणं अवघड होतं. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये मशरूमसह भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी घरी येऊन मशरूमची लागवड सुरू केली.
2 लाखांपेक्षा जास्त कमाई
पहिल्यांदा मशरूम विकून 10,000 रुपये कमावले. यासोबतच शून्य मशागत पद्धतीने दोन कुंड्यांमध्ये बटाटे घेतले. त्यामुळे 40 मणहून अधिक बटाट्याचे उत्पादन झाले. त्या पुढे सांगतात की, बटाट्याच्या लागवडीसोबतच एक बिघामध्ये मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी आणि इतर भाज्यांची लागवड करतात. यामुळे त्यांना वर्षभरात 2 लाखांहून अधिक कमाई होत आहे.