Success Story : वर्षभरात तीन पिके; वार्षिक 9 लाखांचे उत्पन्न; महिला शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक सुशिक्षितांचा ओढा शेतीकडे वाढताना (Success Story) दिसत आहे. परिणामी, सध्या नोकरीला फाटा देत किंवा शिक्षणानंतर थेट शेतीची वाट धरत, अनेकजण शेतीमधून मोठी कमाई करताना दिसत आहे. आज आपण अशाच महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. दीपाली आशिष खुणे असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील रहिवासी आहेत. दीपाली यांनी आपल्या शेतीमध्ये मागील संपूर्ण वर्षभरात एकूण तीन पिके घेत, वार्षिक 9 लाखांचा निव्वळ नफा (Success Story) मिळवला आहे.

पारंपारिक पिकांना फाटा (Success Story Of Women Farmer)

शेतकरी दीपाली आशिष खुणे यांचे कृषी क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण झाले (Success Story) असून, त्यांना माहेरी असतानापासून शेतीचा लळा लागेलला होता. गाेंदिया जिल्ह्यातील चिचटाेला येथील माहेर असलेल्या दीपाली यांनी सासरी आल्यानंतर शेतीत अनेक बदल केले. त्यांची सासरी एकूण 25 एकर शेती आहे. मात्र, सासरी आल्यानंतर त्यांचे कुटुंबीय धान या पारंपारिक पिकांची शेती करत होते. मात्र, त्यांनी सर्वप्रथम कुटुंबियांना भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्याकडे वळवले. इतकेच नाही तर स्वतः कंबर कसून शिक्षण, संसार सांभाळत जोडीदाराच्या साथीने दीड एकर शेतीमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली.

कोणत्या पिकांची लागवड?

कृषी क्षेत्रात बीएस्सी पदवीधर असलेल्या दीपाली आपल्या दीड एकरात वर्षभरात टोमॅटो, काकडी, ढेमसा, कारले व चवळी यांसारख्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. ज्यात त्या भाजीपाला पिकांवर येणाऱ्या प्रत्येक रोगावर बारीक नजर ठेवून असतात. इतकेच नाही तर राेगाची ओळख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, माेबाइल ॲपचाही मदत घेतात. ज्यामुळे त्यांना अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

किती मिळतंय वार्षिक उत्पन्न?

शेतकरी दीपाली खुणे यांनी मार्च 2023 ते मे 2023 मध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यातून त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. त्याच दीड एकरात त्यांनी जून ते ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी कारले व चवळीचे पीक घेतले. त्यापासून त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या या दीड एकर शेतीत डिसेंबर 2023 ते मार्च
2024 दरम्यान टरबुज पिकाचे उत्पादन घेतले. ज्यातून त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

अर्थात एकूण वर्षभरात त्यांना मार्च 2023 ते मार्च 2024 या कालावधीत दीड एकर शेतीत चक्क नऊ लाख रुपयांचे उत्पन्न (Success Story) मिळाले आहे. सध्याच्या घडीला त्यांनी आपल्या या दीड एकरात काकडी व ढेमसा पिकाची लागवड त्यांनी केली आहे. ज्यातून त्यांना आगामी काळात चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!