ओसाड जमिनीवर केली डाळिंबाची यशस्वी लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून विविध प्रयोग करून बागायतीकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील शेतकरी कृष्णा चावरे यांनी केला आहे. चावरे यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने खडकाळ ओसाड जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आणि आता बाग फुलू लागली आहे. आणि शेतकऱ्याला लाखोंचा नफाही मिळत आहे. शेतकऱ्याची ही डाळिंब बाग पाहण्यासाठी लांबून शेतकरी येत आहेत. सध्या त्यांच्या बागेतील एका कॅरेट डाळिंबाची किंमत 3100 ते 2100 रुपये प्रति कॅरेट आहे.

चावरे पूर्वी वडिलोपार्जित शेतीत कापूस, तूर आणि कांदा पिके घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जमीन खडकाळ असल्याने उत्पादन होत नव्हते. म्हणून काहीतरी वेगळं करून पाहायचं ठरवलं. यानंतर त्यांनी सात एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. चावरे म्हणाले की, योग्य नियोजन करून यंदा प्रथमच डाळिंबातून पंचवीस लाखांचा नफा मिळणार आहे.

कृष्णा चावरे यांनी पारंपरिक शेती सोडून काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. ते स्वत: कृषी सेवा केंद्र चालवत असल्याने त्यांनी आपल्या सात एकर शेतात डाळिंबाची बाग लावण्याचे ठरवले. त्यांनी 2020 मध्ये शेतीचे नियोजन केले आणि 2000 हजार झाडे लावली. या काळात त्यांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागले. योग्य नियोजन आणि कृषी सल्ल्याने त्यांनी आपली बाग विकसित केल्याचे शेतकरी कृष्णा यांनी सांगितले. आता ते पहिल्या वर्षी संपूर्ण फळे विकणार आत . आणि त्यांना लाखोंचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. चावरे यांना डाळिंबाच्या बागेसाठी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे.

सात एकरात लावली डाळिंबाची रोपे

चावरे यांची कोळीबोडखा शिवारात आपली वडिलोपार्जित जमीन असून सात एकरात दोन हजार रोपे लावली असून आता त्यांची डाळिंबाची बाग बहरली आहे. व उर्वरित क्षेत्रात तूर लागवड केली आहे. डाळिंब बागेसाठी अडीच लाख रुपये खर्च केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. आता त्यांना वर्षाला पंचवीस लाखांचा नफा अपेक्षित आहे. चवरे यांचे डाळिंब नाशिकमध्ये विकले जातात. सध्या त्यांना यासाठी 3100 ते 2100 रुपये प्रति कॅरेट मिलचा दर मिळत आहे.

फळबागांवर रोगाचा हल्ला

यंदा मराठवाड्यात दमदार पाऊस झाला असून गेल्या तीन वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. याचा फटका पैठण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला. कधी रिमझिम तर कधी अतिवृष्टीमुळे डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोग, काळे डाग यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बागा नष्ट कराव्या लागल्या. मात्र पैठणमधील कोळीबोडखा येथील कृष्णा चवरे यांनीही जिद्द आणि मेहनतीने खडकाळ जमिनीवर डाळिंबाच्या बागा वाढवून अशा परिस्थितीला तोंड देत खंबीरपणे उभे राहिले.

error: Content is protected !!