हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने साखर (Sugarcane Crushing Season) आणि इथेनॉलची किमान विक्री किंमत ( Ethanol MSP) वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत तर या हंगामात अनेक साखर कारखाने (Sugar Factory) गाळप सुरू करू शकत नाहीत, असा इशारा महाराष्ट्रातील साखर उद्योगाने दिला आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या, उद्योगाने साखरेच्या किमान किमतीत (Sugar MSP) किमान ₹7 वाढ आणि इथेनॉलच्या किमतीत ₹5 ते ₹7 वाढ करण्याची मागणी करणारे तातडीचे निवेदन केंद्र सरकारला सादर केले आहे. गळीत हंगामातील (Sugarcane Crushing Season) व्यापक व्यत्यय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane Farmers) संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही मागणी 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन उद्योग नेत्यांनी केले आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) 23 व्या ऊस परिषदेत चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला 3700 रुपयांची एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. तसेच त्यांनी गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी तातडीने 200 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा अशीही मागणी केलेली आहे (Sugarcane Crushing Season).
मागील काही वर्षापासून मजूर टंचाई (Labor Shortage) यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच निवडणूक असल्याने शेतकरी संघटना आक्रमक होऊन ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करू पाहत आहेत. यातच साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) थांबवण्याचा इशारा दिल्याने यात उस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.