Sugar Production : दुष्काळातही महाराष्ट्राने करून दाखवले; यंदा 110 लाख टन साखर उत्पादन!

0
3
Sugar Production In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात २०२३-२४ चा साखर ऊस गाळप हंगाम सुरु होताना, एकूण साखर उत्पादनाबाबत (Sugar Production) घट होण्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र, आता गाळप हंगामाचा शेवट गोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यात सर्व साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. याबाबत साखर आयुक्तालयाकडून (Sugar Production) अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे.

मागील वर्षीपेक्षा 4.8 लाख टन उत्पादन अधिक (Sugar Production In Maharashtra)

२०२३-२४ या राज्यातील ऊस गाळप हंगामात एकूण १०७३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तर या उसापासून राज्यात एकूण १ हजार १०१ लाख क्विंटल (११०.१ लाख टन) साखर उत्पादन (Sugar Production) झाले आहे. मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामात एकूण १ हजार ५५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून १ हजार ५३ लाख क्विंटल (१०५.३ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले होते. अर्थात यावर्षीच्या गाळप हंगामात एकूण ४८ लाख क्विंटल (४.८ लाख टन) साखरेचे उत्पादन अधिक झाले आहे.

साखर उताराही अधिक

मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामात राज्यातील सरासरी साखर उतारा हा ९.९८ एवढा होता. ज्यात २०२३-२४ या राज्यातील ऊस गाळप हंगामात वाढ होऊन, तो १०.२७ एवढा झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण साखर उत्पादनात (Sugar Production) वाढ होण्यास मदत झाली आहे. दुष्काळामुळे साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. परिणामी, साखर उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.

अखेर सर्व कारखाने बंद

यंदा राज्यात गाळप केलेल्या एकूण २०७ साखर कारखान्यांपैकी खासगी साखर कारखान्यांची संख्या जास्त होती. त्यापैकी १०३ सहकारी तर १०४ खासगी साखर कारखाने होते. त्यापैकी सर्व साखर कारखान्यांचे गाळप १४ मे अखेर संपलेले आहे. तर यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही अधिक झाले आहे. त्यामुळे यंदाचा उस गाळप हंगाम मागच्या वर्षीपेक्षा सरस ठरला आहे.

विभागवार साखर उत्पादन

कोल्हापूर विभाग – २८०.६४ लाख क्विंटल
पुणे विभाग – २५१.३१ लाख क्विंटल
सोलापूर विभाग – २०६.५९ लाख क्विंटल
अहमदनगर विभाग – १४१.१२ लाख क्विंटल
छत्रपती संभाजीनगर विभाग – ८८.५३ लाख क्विंटल
नांदेड विभाग – १२०.८५ लाख क्विंटल
अमरावती विभाग – ९.३९ लाख क्विंटल
नागपूर विभाग – ३.२७ लाख क्विंटल