Sugar Production : ऊस गाळप विनापरवाना उल्लंघना प्रकरणी साखर आयुक्तांचा ‘या’ कारखान्यांना दणका! पहा संपूर्ण यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugar Production) : कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडे त्या व्यवसायाचा परवाना असणे गरजेचे असते. जर तो परवाना आपल्याकडे असेल तर त्याचा फायदा आपल्याला होतो. मात्र, परवाना नसेल तर आपल्याला व्यवसाय करणे अवघड होऊन बसते. दरम्यान, असाच एक प्रकार सोलापुरमध्ये ऊस गाळप परवाना उल्लंघना प्रकरणी झाला आहे. राज्यातील २२ साखर कारखान्यांना १७६.५४ कोटी रुपयांचा दंड केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांचा समावेश आहे. यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी चांगलाच दणका दिला आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एफआरपी (FRP) रक्कम आणि अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही गाळप साखर कारखान्यांना परवाना देता येत नाही. असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, विविध देय रक्कम आणि थकीत एफआरपी देणे बाकी असतानाही विनापरवाना ऊस गाळप सुरू केले. यात २२ कारखाने आहेत. सोलापूरचे एकूण ८ कारखाने आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील या ८ साखर कारखान्यांना दंड
ओंकार शुगर कारखान्यात ४१ लाख १४ हजार ५०० एवढा दंड करण्यात आला. (Sugar Production)
आष्टी शुगर कारखान्यास १ कोटी १२ लाख ६७ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
मकाई कारखान्यास ७ कोटी ९६ लाख ६७ हजार ५०० एवढा दंड आकारण्यात आला.
मातोश्री लक्ष्मी शुगर- एक कोटी १६ लाख ५२ हजार ५००.
भीमा सहकारी साखर कारखान्यास १३ कोटी ३ लाख ५५ हजार दंड.
जकाराय साखर कारखान्यास १० कोटी ५७ लाख २० हजार दंड ठोठावला.
श्रीशंकर सहकारी साखर कारखान्यात १ कोटी ६१ लाख ४६ हजार ५०० एवढा दंड आकारला आहे.

पुणे जिल्ह्यात ‘या’ साखर कारखान्यांना दंड
राजगड या कारखान्यात २ कोटी ६२ लाख ७५ हजार ५००
निरभिमा या साखर कारखान्यास ३ कोटी १६ लाख
कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्यास १९ कोटी ६४ लाख ४५ हजार ५००

धाराशिव जिल्हा –
डीडीएनएसएफए एक कोटी २७ लाख तर कंचेश्र्वर ३ कोटी ६४ लाख ३० हजार

जालना जिल्हा –
समृद्धी शुगर्स १४ कोटी ६४ लाख १८ हजार ५००
श्रद्धा एनर्जी १५ कोटी ९७ लाख ९५ हजार ५००
रामेश्वर- पाच कोटी ५२ लाख ५० हजार दंड आकारला आहे.

हिंगोली जिल्हा –
हिंगोली जिल्ह्यात टोकाई कारखान्याला ५ कोटी ४५ लाख २५ हजार

कोल्हापूर जिल्हा –
तात्यासाहेब कोरे नऊ कोटी 61 लाख 45 हजार. (Sugar Production)

बीड जिल्हा –
जय भवानी कारखान्याला २ कोटी ४४ लाख ३० हजार ५००

जळगाव जिल्हा –
संत मुक्ताई कारखान्यात १५ कोटी ३ लाख ८५ हजार

छत्रपती संभाजीनगर –
घृणेश्वर १० कोटी ४ लाख ५३ हजार

error: Content is protected !!