Sunday, October 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Sugarcane Farming : ऊस लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या जाती कोणत्या? जाणून घ्या

Radhika Pawar by Radhika Pawar
February 16, 2023
in पीक माहिती, पीक व्यवस्थापन, विशेष लेख
Sugarcane Farming
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugaecane Farming) । ऊस हे नगदी पीक भारतात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साखर उत्पादनात भारताचा जगात अव्वल क्रमांक आहे. ऊस लागवड अनेक वर्षांपासून भारतात केली जाते. आज आपण सर्वात जुन्या उसाच्या जातींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यातील गुणदोषांमुळे यातील काही जाती आता बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे म्हणून आम्ही हि ऊस जातीबाबतची एक विशेष लेखमाला देत आहोत.

Table of Contents

  • हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा
  • प्रसारित जाती –
  • प्रसारित जाती (Sugarcane Farming)
  • तुमच्या गावाजवळील सर्व Tractor, JCB, ऊस तोडणी यंत्र, रोटावेटर यांच्याशी असा साधा संपर्क

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला Ripar प्रमाणे इतर कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

Download Hello Krushi Mobile App

प्रसारित जाती –

  1. को ४१९, को ७४०
  2. को ७२१९ (संजीवनी)
  3. को- एम् ७१२५ (संपदा)
  4. को ७५२७
  5. कोसी ६७१ (वसंत)

संस्थेच्या संकर कार्यक्रमात व अखिल भारतीय समन्वयीत उस संशोधन प्रकल्पांतर्गत दक्षिण भारताकरिता ( पेनिनसुलार झोन) विविध ऊस वाणांच्या चाचण्या व्हीएसआय, पुणे येथे घेण्यात येतात.

प्रसारित जाती (Sugarcane Farming)

■ को ४१९

ऊस उत्पादन १३२ टन/ हे. आणि साखरेचे उत्पादन १८.८ टन/हे.

वैशिष्ट्ये–
ही जात पीओजे २८७८ व को २९० या दोन वाणांचा संकर असून लागवडीसाठी १९३६ साली शिफारशीत करण्यात आली. ही जात लवकर पक्व होत असल्याने सुरवातीच्या ऊस गळीत हंगामात गाळप करण्यास चांगली आहे. निरनिराळ्या प्रकारची जमीन व हवामानात ही जात चांगली येते. ही जात रसवंतीसाठी योग्य आहे.

ओळखण्याच्या खुणा –
पाने हिरवी, मध्यम रुंद असून देठांवर कूस असते. ऊस जाड असून कांडीवर कटकन मोडतो. उस रंगाने हिरवट असतो, परंतु पाचट काढल्यावर त्यांचा रंग अंजिरी होतो.

गुणदोष –
खोडवा बरा येतो. मात्र खोडव्यात गवताळवाढ या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या जातीचे क्षेत्र कमी झाले आहे.

■ को ७४०

उस उत्पादन १५५.३५, १२२.७० व १०६.३५ टन/ हे. आणि साखर उत्पादन २०.००, १७.०० व १३.०० टन/ हे. (अनुक्रमे आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरु हंगाम)

वैशिष्ट्ये –
ही जात को ४२१ व को ४४० आणि को ४६४ व को ४४० अशा द्विसंकर पद्धतीने तयार करण्यात आली असून महाराष्ट्रात सन १९५६ मध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली. या जातीमध्ये असणाऱ्या अधिक चांगल्या गुणांमुळे ती टिकून होती. फुटव्यांची क्षमता जास्त असून फुटवे येण्याचा कालावधी ही जास्त आहे. सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते व त्याचप्रमाणे पाण्याचा ताण किंवा जास्त पाणी असलेल्या परिस्थितीतही तग धरु शकते. पक्वता उशिरा येते. साखरेचे प्रमाण जास्त कालावधीपर्यंत टिकवून ठेवण्याची क्षमता या जातीमध्ये आहे. त्यामुळे तोडणीस उशीर झाला तरी साखर उत्पादनामध्ये विशेष घट होत नाही. खोडवा चांगला येतो.

ओळखण्याच्या खुणा –
या जातीची पाने मध्यम रुंदीची व उभट असून पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. ऊस रंगाने हिरवट पिवळसर दिसतो. देठावर अत्यल्प प्रमाणात कूस आढळते. टिपरी दोन्ही टोकास निमुळती असून मध्यभागी थोडी फुगीर असते. त्या एकमेकास तिरकस जोडलेल्या असतात.

गुणदोष –
ही जात उशिरा पक्व होते. गवताळ वाढ व काणी रोगास बळी पडते सध्या ही जात महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडी खाली नाही.

तुमच्या गावाजवळील सर्व Tractor, JCB, ऊस तोडणी यंत्र, रोटावेटर यांच्याशी असा साधा संपर्क

शेतकरी मित्रांनो अनेकदा आपल्याला आपल्या गावाजवळील भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत नाही. यामध्ये ऊस तोडणी यंत्र, गहू काढणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटावेटर, JCB अशा यंत्राचा समावेश आहे. आपल्याला शेतीच्या कामाकरता हि यंत्रे वरचेवर लागत असतात. परंतु अनेकदा आपल्या गावातील यंत्र कुठेतरी कामावर असल्याने आपल्याला वाट पाहत बसावी लागते. मात्र आता Hello Krushi या मोबाईल अँप च्या साहाय्याने आपल्याला आपल्या गावाच्या जवळील कोणत्याही भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या यंत्राच्या मालकाला फोन करता येऊ शकतो. त्यामुळे आता ऊस तोडणी यंत्र, गहू काढणी यंत्र यांना शोधण्यासाठी तुम्हाला दुचाकीवरून आसपासची गावं पालथी घालण्याची अजिबात गरज नाही. यासाठी खालील Download या बटनावर क्लिक करून

Download Hello Krushi App
■ को ७२१९ (संजीवनी)

ऊस उत्पादन १३१.३६ टन/हे. आणि साखर उत्पादन १८.७० टन/हे. (पूर्व हंगामी)

वैशिष्ट्ये –
ही जात को ४४९ आणि को ६५८ या दोन वाणांचा संकर असून सन १९८२ मध्ये ती महाराष्ट्रात पूर्वहंगामी ( ऑक्टोबर-नोव्हेंबर) लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली. ही जात तीनही लागण हंगामात, मध्यम अथवा खोल परंतु निचऱ्याच्या जमिनीत चांगला प्रतिसाद देते. काणी व गवताळ वाढ रोगास काही प्रमाणात प्रतिकारक आहे. पालाश आणि लोह या अन्नद्रव्यांना ही जात योग्य प्रतिसाद देते.

ओळखण्याच्या खुणा –
पाने थोडी हिरवट पिवळी, रुंद, मऊ आणि शेंड्याकडे खाली वाकलेली असतात. कांडीवर डोळ्याच्या रेषेत उभी खाच (पन्हाळी) असते. डोळे बदामी आकाराचे असतात व कांडीवर डोळ्याच्या उभ्या रेषेत खाच असते. कांड्यांचा रंग हिरवट-पिवळसर असतो.

गुणदोष –
उसाची तोडणी १५ महिन्यांच्या पुढे गेल्यास साखरेचे विघटन झपाट्याने होऊन साखरेचे प्रमाण कमी होते. उसामध्ये दशीचे (पोकळपणा) प्रमाण वाढते व ऊस उत्पादन घटते. काणी रोगाने प्रमाण वाढल्यामुळे या जातीचे क्षेत्र महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीखाली नाही.

■ को ७५२७

उस उत्पादन १२२ टन / हे. आणि साखर उत्पादन १७.२ टन / हे.

वैशिष्ट्ये –
ही जात को ६२१७५ आणि को ६५८ या वाणांचा संकर असून १९८८ साली या जातीची कोल्हापूर विभागासाठी फक्त सुरु लागण हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात मध्यम व खोल काळ्या जमिनीत चांगला प्रतिसाद देते. उर्वरीत महाराष्ट्रात या जातीची लागवड करू नये. ही मध्यम उशिरा तयार होणारी व सरळ वाढणारी असून या जातीला तुरा कमी येतो. ही जात गवताळ वाढ रोगाला मध्यम प्रतिकारक आहे. मार्च ते मे या कालावधीत गाळपास चांगली आहे. बुडख्याकडील कांड्या पक्व झाल्यानंतर त्यावर खोल भेगा पडतात व तो या जातीचा अनुवंशिक गुण आहे.

ओळखण्याच्या खुणा –
या जातीची पाने लांब, रुंद, गर्द हिरवी, सरळ व टोकास वळलेली असतात. पानाच्या देठावर पांढरट ठिपके असून त्यावर कूस नसते. उस हिरवट पिवळा, जाड असून डोळ्याजवळील भाग फुगीर असतो. बुडाकडील कांड्यावर भेगा पडतात.

गुणदोष –
या जातीमध्ये साखरेचे प्रमाण कमी मिळते तसेच काणी रोगास बळी पडते. त्यामुळे या जातीचे क्षेत्र महाराष्ट्रात कमी झाले आहे.

■ कोसी ६७१ (वसंत)

ऊस उत्पादन १२६ टन/ हे. आणि साखरेचे उत्पादन २१.५२ टन/हे.

वैशिष्ट्ये –
ही जात क्यु ६३ व को १०७५ या वाणांच्या संकरापासून कडलोर (तामिळनाडू) येथील ज्ञानी कोईमतूर येथे न तयार केली म्हणून या जातीचे नाव कोसी असे दिले आहे. ही जात १९९४ मध्ये महाराष्ट्रासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत प्रसारित केली आहे. ही जात लवकर पक्व होणारी असून कारखान्यात हंगामाच्या सुरुवातीच्या व शेवटी गाळपासाठी योग्य आहे. साखरेचे प्रमाण सध्या प्रसारित केलेल्या सर्व जातींपेक्षा जास्त आहे. ही जात गुळासाठी अति उत्तम आहे. पूर्वहंगामी व सुरु हंगामात लागणीस योग्य आहे. निचऱ्याच्या, मध्यम खोलीच्या काळ्या जमिनीत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय व जैविक खते यांना उत्तम प्रतिसाद देत असल्याने भरीव उत्पादन मिळते. ही जात पाण्याचा ताण सहन करते. ज्या कारखान्यांनी कोसी ६७१ जातीचे ६०% पेक्षा जास्त गाळप केले, त्या कारखान्यांनी साखर उताऱ्याच्या बाबतीत उच्चांक गाठलेला आहे.. तेव्हा इतर कारखान्यांनीही जास्तीत जास्त साखर उतारा मिळविण्यासाठी गळीत गापाच्या सरुवातीला नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात ८० ते ९०% कोसी ६७१ या जातीच्या उसाचे गाळप करावे. जानेवारी व फेब्रुवारी या कालावधीत कोसी ६७१ जातीचा ऊस कमीत कमी ६० ते ९०% गाळप करावा व मार्च – एप्रिल दरम्यान ५०% पर्यंत आसपास गाळप करावे, कारण सध्या जास्तीत जास्त साखर उतारा देणारी ही एकमेव जात आहे. ऊस तोडणीनंतर लगेचच खोडवा व्यवस्थापन केल्यास एकरी ऊस उत्पादन चांगले मिळते.

ओळखण्याच्या खुणा –
पाने लांब, मध्यम रुंद आणि गर्द हिरवी असून देठावर भरपूर प्रमाणात कूस आहे. या जातीची पाने पक्व झाल्यावर गळून पडतात. उसाचा रंग तांबूस-हिरवट, पिवळसर (आकर्षक रंग) असून ऊसाची कांडी लांब व मध्यम असते. उसाच्या कांड्यावर अजिबात मेण नसल्याने उसातील रसशुद्धीचे प्रमाण वाढते.

गुणदोष –
या जातीच्या पानांच्या देठावर कूस असते. ही जात गवताळ वाढ या रोगास काही प्रमाणात बळी पडणारी आहे. कांडी कीड, पांढरी माशी, बुडखा कांडी कीडीस ही जात बळी पडणारी आहे. तेव्हा या जातीची लागवड करताना बेणे मळ्यातील बेणे वापरून रोग-कीड प्रतिबंधक उपाय वेळोवेळी अंमलात आणणे अत्यंत आवश्यक आहे. मशागतीचे व पाणी व्यवस्थापन तंत्र अवलंबिणे आवश्यक आहे. पाणी साचून राहणे व पाणी कमी या परिस्थितीत ही जात उत्पादन कमी देते.

Tags: Sugarcane CultivationSugarcane FarmingSugarcane Harvester
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यात ‘या’ भागात पाऊस सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज

September 29, 2023
India drought 2023

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

September 29, 2023
Dr Swaminathan

Dr Swaminathan : हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांचे निधन

September 29, 2023
Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group