Sugarcane Farming : आडसाली ऊसाचे फेब्रुवारी महिन्यात कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस (Sugarcane Farming) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस तोडणी सुरु आहे. कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर आता अनेक शेतकरी पुन्हा उसाची लागण करत आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात ऊस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? कोणत्या वाणाची निवड करावी? एकरी किती प्रमाणात खत वापरावे? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आज आपण आडसाली ऊसाचे फेब्रुवारी महिन्यात कसे व्यवस्थापन करावे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

असा मिळवा मोफत कृषी सल्ला –

शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टोअरला जाऊन आजच Hello Krushi नावाचे अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. इथे शेतीशी निगडित अनेक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. यामध्ये कृषी सल्ला, शेतीसंबंधी बातम्या, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधन याबद्दल माहिती दिली जाते. तसेच सातबारा उतारा, जमीन नकाशा, बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री असा अनेक सुविधा Hello Krushi अँप वर देण्यात येतात. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.

इथे खाली आम्ही फेब्रुवारी महिन्यात आडसाली उसाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (Sugarcane Farming Tips)

१) ऊस बांधणीच्या अवस्थेत असलेल्या आडसाली उसाला हेक्टरी १६० किलो नत्र (३४५ किलो युरिया), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा देऊन ऊस बांधणी करावी. को-८६०३२ या ऊस जातीसाठी २५% रासायनिक खतमात्रा वाढवून द्यावी.

२) पूर्व हंगामी उसातील आंतरपिकाची बटाटा, फ्लॉवर, कोबी, मुळा, गाजर, व कांदा इ. पिकांची काढणी त्यांची अवस्था पाहून करावी.

३) १२ ते १६ आठवडे झालेल्या उसाला नत्राचा तिसरा हप्ता द्यावा. यासाठी हेक्टरी ३४ किलो नत्र ( ७४ किलो युरिया) वापरावे, नत्रयुक्त खताबरोबर ६:१ या प्रमाणात निंबोळी पेंडीची भुकटी खतामध्ये मिसळून द्यावी..

४) उसाची लागण सलग सरीवर मध्यम जमिनीत १००-१२० सें.मी., भारी जमिनीत १२० – १५० सें. मी. अंतरावर करावी अथवा ७५-१५० सें.मी. किंवा ९०-१८० सें. मी. जोड ओळ पध्दतीने करावी.

५) लागणीसाठी को.एम. ०२६५ (फुले २६५), को.८६०३२ (निरा), नवीन प्रसारीत वाण फुले १०००१, को.एम. १२०८५ (को.एम. ९०५७), को.सी. ६७१, व्ही.एस.आय. १२१२१ व को. व्ही. एस. आय. ९८०५ यापैकी वाणाची निवड करावी. लागणीसाठी एक अथवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या वापराव्यात.

६) लागणीपूर्वी बेणे ३०० मि.ली. मॅलॅथिऑन आणि १०० ग्रॅम बाविस्टीन (कार्बेन्डॅझिम) १०० लिटर पाण्यात बेणे मिसळून तयार केलेल्या द्रावणात १०-१५ मिनीटे बुडवावे व नंतर ॲसिटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये टिपऱ्या ३० मिनीटे बुडवून नंतर लागण करावी यामुळे नत्र खताची ५०% बचत होते.

७) सुरु उसाच्या लागणीच्या वेळी प्रति हेक्टरी २५ किलो नत्र (५५ किलो युरिया) ६० किलो स्फुरद (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. तसेच रासायनिक खतांबरोबर मृद परीक्षणानुसार झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, मँगेनीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ या प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून एकत्रित करुन खते रांगोळी पध्दतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर द्यावीत.

८) ठिबक सिंचनाची सोय असल्यास 1 ते 4 आठवड्यांपर्यंत उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी ३० किलो नत्र, ९ किलो स्फुरद व ९ किलो पालाश हि अन्नद्रव्ये सात दिवसांच्या अंतराने चार समान हप्त्यात विभागून ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत.

९) बेणे मळयातील बेणेच निवडुन ऊस लागवडीसाठी वापरावे. तीन वर्षातून एकदा उसाचे बियाणे बदलावे, खोडव्याचा ऊस लागणीसाठी वापरु नये.

१०) मध्यम प्रतिच्या जमिनीत ओली लागण करावी, चोपण जमिनीत कोरडी लागण करावी. भारी व

११) ऊस लागणीनंतर ४-५ दिवसांनी वापसा आल्यावर हेक्टरी ५ किलो अँट्राझीन (अँट्राटाफ) प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात विरघळून संपूर्ण जमिनीवर हात पंपाने सकाळी किंवा सायंकाळी फवारावे किंवा सेंकार (मेट्रीब्युझीन) १४५० ग्रॅम १००० लिटर पाण्यात मिसळून, जमिनीवर फवारणी करावी, फवारणी करतांना फवारलेली जमीन तुडवू नये.

१२) सुरू उसामध्ये उन्हाळी भुईमूग, कांदा, काकडी, पानकोबी, फुलकोबी, नवलकोल, मेथी व कोथींबीर, भेंडी इ. पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.

१३) ऊस तोडणी नंतर शेतातील पाचट पेटवू नये. खोडवा ठेवताना पाचटाची कुट्टी करू नये अगर पाचट एकाआड एक सरीत ठेवू नये.

१४) ऊस तोडणीनंतर पाचट सलग सरीत दाबून उसाचे बुडखे मोकळे करून घ्यावेत.

१५) उसाचे बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर ०.१% कार्बेन्डॅझिम ( बाविस्टीन) (१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम ) . पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू किंवा शेणखत कंपोस्ट खतामध्ये मिसळून पाचटावर टाकावेत.

१६) पहिले पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यानंतर पहारीच्या सहाय्याने हेक्टरी १२५ किलो नत्र, ५८ किलो स्फुरद, ५८ किलो पालाश यांचे मिश्रण तसेच झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ या प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून एकत्रित करुन बुडख्यापासून सरीच्या एका बाजूला १५ ते २० सें.मी. अंतरावर व १५ सें.मी. खोलीवर पहारीने छिद्र घेवून द्यावे, दोन छिद्रातील अंतर ३० सें.मी. ठेवावे.

१७) ठिबक सिंचनाची सोय असल्यास १ ते ४ आठवडयापर्यंत उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी ३० किलो नत्र, ९ किलो स्फुरद व ९ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत.

१८) किडग्रस्त/तणग्रस्त लागण क्षेत्र असल्यास खोडवा ठेवू नये. तसेच कमीत-कमी हेक्टरी १ लाख उसांची संख्या असलेल्या क्षेत्रातच खोडवा ठेवावा.

error: Content is protected !!