हेलो कृषी ऑनलाईन : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम (Sugarcane Harvesting Season) येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कारखान्यांनी व साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री समितीच्या बैठकीत दिल्या. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
हंगाम नियोजनाबाबत (Sugarcane Harvesting Season) उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्य सरकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर कारखाना संघाचे संचालक प्रकाश आवाडे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आदी उपस्थित होते.
ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. राज्यात ऊस शेती व त्यावर आधारीत कारखानदारी ही ग्रामीण भागातील विकासाचे प्रतिक आहे. महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. तसेच साखर उत्पादनामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.