हॅलो कृषी आॅनलाईन : उन्हाळ्यात तापमान अधिक असते. अशा वातावरणात थंड पेय अधिकाधिक लोक पिताना दिसतात. या ऋतूत लोकांची ऊसाच्या रसाची मागणी वाढते. परंतु आता याच ऊसाच्या रासावर चक्क १२ टक्के जी. एस. टी. कर (GST) करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील ॲडवान्स रुलिंग अथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबत निर्णय दिला आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र हा GST कर रस्त्यावर किंवा गाड्यांवर विकत असणाऱ्या ऊसाच्या रसाला आकारला जाणार नाही. ऊसाचा रस हा कृषी उत्पादनात मोडत नसल्याने उत्तर प्रदेशच्या (Authority For Advance Ruling) ने सांगितलं आहे. तसेच गाड्यावरील ऊसाच्या रसावर जीएसटी असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो.
व्यापारी तत्त्वावर जर ऊसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल. असे उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हटले आहे. ऊसाचा रस हा कृषी उत्पनात मोडत नाही. उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते. यामुळे या रसावर जीएसटी लागू होईल का? ही मही मिळवण्यासाठी जीएसटी ॲडव्हान्स रूलिंग अथॉरिटीकडे संपर्क केला.