हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील (Sugarcane New Variety) चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (PDKV Akola) नुकतीच संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 52 वी बैठक संपन्न झाली (Joint Agresco 2024).
या तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 52 व्या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (MPKV Rahuri) विकसित केलेले उसाचे हे नवीन वाण (Sugarcane New Variety) प्रसारित करण्यात आले आहे.
उसाचा नवीन वाण (Sugarcane New Variety)
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले ऊस 15006’ (MS 16081) हा उसाचा नवीन वाण (Sugarcane New Variety) महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी (Sugarcane Farmers) प्रसारित करण्यात आला आहे.
फुले ऊस 15006’ वाणाची वैशिष्ट्ये
- फुले ऊस 15006’ (Phule 15006) अधिक ऊस उत्पादन देणारा वाण (Sugarcane New Variety) असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हा एक मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण राहणार आहे.
- विशेष म्हणजे या जातीचा साखरेचा उतारा ही हा इतर जातींच्या तुलनेत अधिक आहे.
- हा न लोळणारा वाण राज्यात सुरू, पूर्व हंगाम आणि आडसाली लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.
- अधिक ऊस व साखर उत्पादन देणारा हा वाण राज्यातील शेतकर्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
ऊस (Sugarcane) हे महाराष्ट्रातील एक नगदी पीक(Cash Crop) आहे. पश्चिम महाराष्ट्रासहित मराठवाडा अन उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. उसाच्या या नवीन जातीच्या संशोधनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार.