Sugarcane New Variety: महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित, लवकर परिपक्व होणारा आणि अधिक उत्पादन देणारा उसाचा नवीन वाण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (MPKV Rahuri) यांनी उसाचा नवीन वाण (Sugarcane New Variety) विकसित केला आहे, ‘फुले 11082’ (Phule Sugarcane 11082)  असे या जातीचे नाव असून हा वाण लवकर परिपक्व होतो, अधिक उत्पादन देतो आणि रोगांनाही प्रतिकारक्षम आहे. जाणून घेऊ या वाणाची वैशिष्ट्ये.

फुले 11082 वाणाची वैशिष्ट्ये (Sugarcane New Variety Features)

  • इतर जातीच्या तुलनेत हा वाण लवकर पक्व (Early Harvesting Sugarcane) होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळते.
  • या वाणाचे उत्पादन इतर वाणांपेक्षा जास्त असते. म्हणजेच, कमी जागेतून अधिक उत्पादन घेता येते.
  • हा वाण (Sugarcane New Variety) चाबूक काणी, पाने पिवळी पडणे, मर आणि लालकूज यासारख्या रोगांना प्रतिकारक (Disease Resistant Sugarcane Variety) आहे.
  • हा वाण खोड कीड, कांडी कीड आणि शेंडे पोखरणाऱ्या किडीस (Pest Resistant Sugarcane Variety) कमी बळी पडतो.
  • या वाणाची मुळे खोलवर जात असल्याने जास्त प्रमाणात पाणी शोषतात.
  • या वाणात साखरेचे प्रमाण जास्त असते.
  • हा वाण अधिक टिकाऊ असल्याने तो वाहतुकीसाठी योग्य आहे.

कमी वेळात अधिक उत्पादन यामुळे हा वाण (Sugarcane New Variety) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. रोगांना प्रतिकारक असल्याने लागवड आणि देखभाल खर्च कमी आणि सोपी आहे. त्यामुळे या वाणाची बाजारपेठेत चांगली मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा या वाणाला लागवडीसाठी मान्यता दिली आहे.

फुले 11082 हा वाण शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकतो. हा वाण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या वाणाचा वापर करून अधिक उत्पादन घ्यावे.

error: Content is protected !!