Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; 3.35 कोटी निधी मंजुर!

0
2
Sugarcane Workers 3.35 Crore Fund
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊसतोड कामावर (Sugarcane Workers) हलाखीचे दिवस काढून, ऊसतोड करत असतात. अशात काही कारणास्तव कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास या कामगारांच्या कुटुंबाच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होते. ज्यामुळे ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यासकडून त्यांना आर्थिक मदत दिली आहे. अशा राज्यातील एकूण 67 ऊस तोड कामगारांच्या कुटूंबास प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे 3 कोटी 35 लाख रुपये वितरित करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

3 कोटी 35 लाखांची मदत (Sugarcane Workers 3.35 Crore Fund)

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील 3 ऊसतोड कामगारांच्या (Sugarcane Workers) वारसांना प्रत्येकी ५ लाखांचा आर्थिक मदत निधी नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे. तर राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील 31, जालना 3, धाराशिव-7, अहमदनगर 23 आणि पुणे 3 असे एकूण 67 प्रस्तावाकरीता 3 कोटी 35 लाख रुपये संबंधित जिल्ह्यांना वर्ग केले आहेत. असे अजित पवार यांनी निधीचे वितरण करताना म्हटले आहे.

प्रत्येकी 5 लाखांची मदत

प्रामुख्याने ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, अशा व्यक्तीचे कुटुंबिय, वारसदारांना महामंडळाच्या वतीने 5 लाख रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील यादव क्षीरसागर आणि उमेश चव्हाण या दोन ऊसतोड कामगाराचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांची मुलगी शिवकन्या क्षीरसागर आणि अन्य एका व्यक्तीचा आर्थिक मदत निधी सुशीला चव्हाण यांना आला आहे. तर उर्वरित एका वारसदाराला लाभ देण्याची कार्यवाही असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

ऊसतोड कामगारांच्या वारसांना मदत निधी देताना आमदार चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश डोके, व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, बबन माने हे उपस्थित होते.