खडकवासला धरणाचे 1 मे ते 15 जूनपर्यंत उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाळा सुरू असल्याने काही भागात विहीर, तलाव कोरडे पडल्याने शेती पिकांची अवघड परिस्थिती पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतीला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याने मुळा, मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

खडकवासला प्रकल्पातून (Khadakvasla Dam project) ४ धरणे मिळून १५ जूनपर्यंत ११ टीएमसी पाणी साठा उपलब्ध होणार असल्याचे नियोजन करण्यात आलं. आहे तसेच काही सिंचन योजनांमुळे पाण्याच्या बचतीसाठी मदत होते. खडकवासला ते लोणी काळभोर प्रकल्प, मुळा- मुठा कालव्यासाठी बोगदा, पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जनाई शिराई योजना बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यंदा पावसाचा अंदाज पाहता धरणातले पाणी वाचवणे फार जिकिरीचे आहे.

यावेळी राज्यात तसेच देशातील काही भागात पाणी टंचाई होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून त्या अनुषंगाने शासनाने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ऑगष्ट महिन्यापर्यंत पाणी कसे पुरवता येईल. या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. यामुळे आता पावसाचे आगमन कधी होणार याकडे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

error: Content is protected !!