हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे विभागात यंदा उन्हाळ पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यंदा पाण्यात अधिकाधिक वाढ झाली असल्याने उन्हाळ पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे. पुणे विभागात एकूण १२६ टक्के पेरण्या झाल्याचं समजतंय. त्यात मुख्यत्वे उन्हाळ बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश आहे.
मागील वर्षी पाऊस देखील चांगला झाला असला तरीही जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांमध्ये नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या उशिराने झाल्या होत्या. सध्या पुणे विभागात पाण्याची चांगली परीस्थिती पहायला मिळत असून उन्हाळ मक्याची १६ हजार २३३, बाजरी पिकाची ६ हजार चारशे २०, उन्हाळ मूग ७४, उडीद ७५ तर भुईमूग १० हजार ३९७, सोयाबीनची ११ हजार ९१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सध्या नगरमध्ये गहू काढणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच उन्हाळ हंगामातील मका आणि भुईमूग पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पुणे जिल्ह्यात गहू काढणी आटपली आहे. बारामती आणि भोर तालुक्यातही पेरणी झाली. तसेच सोलापूर जिल्ह्यातही रब्बी हंगामात रब्बी पिकांची काढणी झाली आहे.
तसेच जिल्ह्यात उन्हाळ मका आणि भुईमूग हे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अक्ककोट, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यात बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्हानिहाय झालेल्या पेरण्या पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय पेरण्या खालील तक्त्यात नमूद करण्यात आल्या आहेत.
जिल्हा – सरासरी क्षेत्र – पेरणी क्षेत्र – टक्के
पुणे – ११०९४ – १३,०१५ – ११७
नगर – ८८८६ – ९०६९. – १०२
सोलापूर – ७६४५ – १२६५६ – १६६
एकूण. – २७,६२५ – ३४७४०. – १२६