Sunflower Rate : सूर्यफुलाला दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत; मिळतोय फक्त ‘इतका’ दर

Sunflower Rate
Sunflower Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sunflower Rate : राज्यातील अनेक शेतकरी तेलबिया लागवड करत असल्याचे दिसत आहे. तेलबियांना चांगला बाजारभाव मिळतो त्यामुळे यामधून चांगला नफा मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकजण याची लागवड करतात. या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील काही शेतकऱ्यांना मदत करत असते. दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त तेलबिया लागवड केली जाते. मात्र आता या ठिकाणी शेतकरी चांगले संकटात सापडले आहेत. या ठिकाणी सूर्यफुलाचे जास्त उत्पादन घेतले जात असून सूर्यफुलाला सध्या दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पीक परवडत नसल्याने मागच्या काही वर्षापासून सूर्यफूल शेती करण्याचं नियोजन केलं. यानंतर त्यांनी सूर्यफुलाचा सातत्याने उत्पादन घेतलं. त्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये चांगला बाजारभाव देखील मिळाला मात्र सध्या सूर्यफुलाला बाजारभाव मिळत नसल्याने सूर्यफूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Sunflower Rate)

सूर्यफुलाला किती बाजारभाव मिळतोय?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सूर्यफुलाला किती बाजार भाव मिळतोय हे चेक करायचा असेल तर तुम्ही ते घरबसल्या अगदी एकच मिनिटांमध्ये करू शकता. यासाठी तुम्हाला एक सोप काम करायचा आहे. तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले hello Krushi मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. अँप हे मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा आणि त्यामध्ये बाजार भाव हा ऑप्शन मिळेल या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सूर्यफुलाचे बाजारभाव पाहू शकतात. त्याचबरोबर तुम्ही इतर शेतमालाचे देखील या ठिकाणी बाजार भाव पाहू शकता.

सूर्यफूल बी शेतकऱ्यांच्या घरात पडून

भंडारा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात गेल्या पाच महिन्यापासून हजारो क्विंटल सूर्यफुल पडून आहे. ] सूर्यफुलाचे भाव वाढतील यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची साठवणूक करून ठेवली आहे. मात्र अजूनही सूर्यफुलाचे भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे अर्थीक संकट उभा राहिले आहे. भात परवडत नसल्याने नवीन उत्पादन घेतलं. मात्र, त्यातही त्यांची अशी परवड होत असल्यानं शेतकरी अर्थिक विवंचनेत सापडला आहे.

येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यफुलाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक एकरासाठी जवळपास २० हजार रुपयांचा खर्च आला असून यामध्ये सात क्विंटल उत्पादन मिळाल आहे. त्याचबरोबर जर सूर्यफूल विक्रीचा विचार केला तर तेल घाणी व्यवसाय एक दोन क्विंटलला दोन ते तीन हजार रुपयात मागणी करत आहे. त्यामुळे आता सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष कधी देणार? याकडे सर्वांचे लागले आहेत.