हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ट्रॅक्टर (Swaraj TARGET 625 Tractor) ब्रँडपैकी एक असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्सने त्यांच्या लोकप्रिय स्वराज टार्गेट रेंज मध्ये ‘स्वराज टारगेट 625’ हा एक नवीन मॉडेल लॉन्च केला आहे. हा ट्रॅक्टर 4WD आणि 2WD या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असून 25HP सेगमेंटमध्ये हा एक क्रांतिकारी ट्रॅक्टर आहे. आपल्या जबरदस्त शक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आणि बहुउद्देशीय वैशिष्ट्यांसह, हा ट्रॅक्टर हलक्या आणि कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरच्या (Swaraj TARGET 625 Tractor) श्रेणीमध्ये नवीन मानक स्थापित करत आहे.
स्वराज टार्गेट 625, (Swaraj TARGET 625 Tractor) विशेषत: 2WD प्रकारात, प्रगत शेती तंत्राचा (Advanced Farming Techniques) अवलंब करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Agriculture Tractor) एक चांगला पर्याय आहे. या ट्रॅक्टरचे शक्तिशाली कार्यप्रदर्शन आणि ऑपरेटरसाठी आरामदायी डिझाइन हे फवारणी आणि आंतर मशागतीच्या विविध शेती कार्यासाठी (Tractor For Intercultural Operations) आदर्श आहे. ट्रॅक्टरचे कॉम्पॅक्ट आकार आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये पिकांचे नुकसान कमी करून त्यांची उत्पादकता वाढविण्यास सहाय्यक ठरते.
स्वराज टार्गेट 625 (Swaraj TARGET 625 Tractor) त्याच्या वर्गातील सर्वात अरुंद ट्रॅक आकार आणि कमी वळण त्रिज्या देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना अवघड भागात सहजतेने काम करता येते आणि त्यांची उत्पादकता वाढते. स्वराज टारगेट 625 ची इंधन कार्यक्षमता आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स सारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे गीअर शिफ्टिंग सहज शक्य होते आणि ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव कारसारखा बनतो.
स्वराज TARGET 625 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आणि फायदे (Swaraj TARGET 625 Tractor Features)
- या ट्रॅक्टरचा शक्तिशाली DI इंजिन83.1 Nm टॉर्क प्रदान करतो, ज्यामुळे हा ट्रॅक्टर 600 लिटरपर्यंत स्प्रेअर सहजतेने खेचू शकतो, अगदी कठीण चिखलाच्या भागातही.
- ॲडजस्टेबल फ्लेक्सी ट्रॅकची रुंदी 28, 32 किंवा 36 इंच केली जाऊ शकते, ज्यामुळे विविध पिकांसाठी योग्य बनते.
- या ट्रॅक्टरची कमाल भार उचलण्याची क्षमता 980 किलोपर्यंत आहे.
- ADDC हायड्रोलिक्स अचूक खोली नियंत्रण प्रदान करते, जे शेती अवजारांसाठी खूप उपयुक्त आहे.
- उच्च PTO पॉवर यामुळे अतिशय कार्यक्षम फवारणी कार्य करता येते.
भविष्यातील अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर (Future Tractor With Updated Technology)
- या ट्रॅक्टरमध्ये (Swaraj TARGET 625 Tractor) असलेले मॅक्स-कूल रेडिएटर आकाराने 20% मोठे असल्यामुळे दीर्घ काळ काम करत असताना देखील ट्रॅक्टर जास्त गरम होणार नाही याची खात्री देते.
- कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशनमुळे गियर शिफ्टिंग सोपी आणि सहज होते.
- चावीच्या सहाय्याने इंजिन चालू/बंद करण्याची सुविधा आहे.
- संतुलित पॉवर स्टीयरिंग कमी जागेत वारंवार वळणे घेताना येणारा थकवा कमी करते.
- स्टायलिश डिजिटल क्लस्टर यामुळे कमी प्रकाशातही चांगले आणि स्पष्ट दिसते
- 540 आणि 540E इकॉनॉमी PTO मोड्स अल्टरनेटर आणि वॉटर पंप सारख्या हलक्या उपकरणांसाठी इंधनाची बचत करतात.
स्वराज टार्गेट 625 (Swaraj TARGET 625 Tractor) हे प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम ट्रॅक्टर आहे जे त्यांची शेती नवीन तंत्रज्ञानाशी जोडून अधिक उत्पादनक्षम करायची असते.